पुण्यात हिताची बँकेच्या ATM मध्ये स्फोट, चोरीच्या उद्देशाने एटीएम उडवल्याचा संशय

चाकण एमआयडीसीमध्ये असलेल्या हिताची बँकेच्या एटीएममध्ये स्फोट झाला. या स्फोटात ATM सह समोरील काचांचा चक्काचूर झाला.

पुण्यात हिताची बँकेच्या ATM मध्ये स्फोट, चोरीच्या उद्देशाने एटीएम उडवल्याचा संशय
चाकण MIDC मध्ये एटीएममध्ये स्फोट
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 11:28 AM

पुणे : हिताची बँकेच्या एटीएममध्ये स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यात चाकण औद्योगिक वसाहत परिसरात भांबोली फाटा येथे ही घटना घडली. चोरीच्या उद्देशाने हा स्फोट घडवला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

नेमकं काय घडलं?

चाकण एमआयडीसीमध्ये असलेल्या हिताची बँकेच्या एटीएममध्ये स्फोट झाला. या स्फोटात ATM सह समोरील काचांचा चक्काचूर झाला. सुदैवाने या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र एटीएममधून किती रोकड चोरीला गेली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महाळुंगे पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले.

पैसे लुटण्याची नवीन मोडस ऑपरेंडी

जिलेटीनच्या सहाय्याने एटीएम उडवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. स्फोट करत पैसे लुटण्याची नवीन मोडस ऑपरेंडी चोरट्यांनी अंमलात आणल्याचं दिसत आहे. याआधी पुणे जिल्ह्यातच शिरुरमधील रांजणगाव गणपती परिसरात देखील असा प्रकार उघडकीस आला होता.

नागपूरमध्ये एटीएममधून हायटेक चोरी

दुसरीकडे, एटीएममधून पैसे काढायचे मात्र त्याची नोंद कोणत्याही खात्यावर न होता सरळ बँकतून पैसे मात्र जात होते. हायटेक पद्धतीचा वापर करुन नागपुरातील वेगवेगळ्या भागातील एटीएममधून पैसे चोरणाऱ्या सायबर गॅंगला नुकतंच नागपूर पोलिसांनी जयपूरमधून अटक केली आहे. अनिस अब्दुल गफ्फुर आणि मोहमद तारीफ उमर हरियाणा अशी आरोपींची नावं आहेत. त्यांनी देशभरात अशाप्रकारे लूट केली असून त्यांची मोठी गॅंग असण्याचा संशय पोलिसांना आहे.

संबंधित बातम्या :

एटीएममधून हायटेक चोरी, सायबर गॅंगला नागपूर पोलिसांकडून जयपूरमध्ये अटक

म्होरक्या येरवडा तुरुंगात, टोळीच्या सदस्यांची मौजमजेसाठी चोरी, दोघे अटकेत

(Pune Chakan MIDC Hitachi Bank ATM Blast)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.