Pune crime : अवघ्या 3 तासांत पोलिसांकडून हत्येचा छडा! 180 रुपयांसाठी मित्राच्या गुप्तांगावर दगड मारत हत्या

Pune crime News : वाद टोकाला गेला. बाचाबाची वाढली आणि त्याचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं. देवरामने अक्षयच्या छातीवर आणि गुप्तांगावर दगड मारला.

Pune crime : अवघ्या 3 तासांत पोलिसांकडून हत्येचा छडा! 180 रुपयांसाठी मित्राच्या गुप्तांगावर दगड मारत हत्या
पुण्यातील धक्कादायक घटना
Image Credit source: TV9 Marathi
विनय जगताप

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 04, 2022 | 8:06 AM

पुणे : पुण्यातील (Pune News) भोर मध्ये दोन मद्यपी मित्रांमध्ये, पैसे देवाण-घेवाणीच्या वादातून झालेल्या मारामारीत एकाचा मृत्यू (Pune Murder) झाला. कन्हैया गायकवाड असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. भोरच्या स्मशान भूमीच्या शेडमध्ये ही घटना घडलीय. आरोपी देवराम माने पळून जाण्याच्या तयारीत असताना तीन तासांच्या आतमध्ये आरोपीला पोलिसांनी अटक केली. 180 रुपये घेतल्याच्या कारणावरून ही मारामारी झालीय. मारामारी दरम्यान आरोपीने अक्षयच्या छातीवर आणि गुप्तांगावर दगड मारल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येच्या (Pune crime news) या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ पावलं उचलत मारेकरी मित्राला शोधण्यासाठी पथकं तैनात केली होती. अवघ्या तीन तासाच्या आत मारेकऱ्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. भोर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा अवघ्या काही तासाच छडा लावलाय.

दारुची नशा, पैशांचा वाद

हत्या करण्यात आलेल्याचं नाव अक्षय गायकवाड असून त्याचं वय 31 वर्ष होतं. अक्षय हा बौद्धनगर भोर इथं राहणारा होता. तर आरोपी देवराम माने हा 32 वर्षांचा इसम नारायणपूर पुरंदर इथं राहणारा होता. ह्या दोघा मित्रांना दारूचं व्यसन होतं. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास दोघ भोरच्या स्मशान भूमीच्या शेडमध्ये ते दारू पीत बसले होते. यावेळी अक्षय याने देवरामच्या खिशातून 180 रुपये काढून घेतले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.

गुप्तांगावर दगड मारला

वाद टोकाला गेला. बाचाबाची वाढली आणि त्याचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं. देवरामने अक्षयच्या छातीवर आणि गुप्तांगावर दगड मारला. त्यानंतर अक्षय तिथेच व्हिवळत पडल्यानंतर देवरामने तिथून पळ काढला.अक्षयचा भाऊ विजय गायकवाड याने अक्षयला भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखलं केलं. मात्र काही वेळातचं त्याचा मृत्यू झाला.

साकिनाका बलात्कार प्रकरणाची मोठी बातमी : Video

हे सुद्धा वाचा

3 तासांत हत्येचा धडा

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी नारायणपूरला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला भोलावडे गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ असताना पोलिसांनी पकडलं. उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील आणि भोर पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्यासह भोर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनेचा अधिक तपास करतायत. हत्येच्या अवघ्या तीन तासांच्या आत पोलिसांनी मारेकरी मित्राच्या मुसक्या आवळल्यात.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें