AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात तरुणीची ‘एन्ट्री’, हवालामार्फत व्यवहार?

pune drug racket | पुणे शहरात काही महिन्यांपूर्वी ड्रग्स तस्कर ललित पाटील याला अटक झाली होती. त्याचा नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखाना होता. त्यानंतर आता पुणे शहरातून आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकट समोर आले आहे. कुरकुंभ येथे ड्रग्सचा कारखाना पोलिसांना मिळाला होता. त्याचे धागेदोरे इंग्लंडपर्यंत आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात तरुणीची 'एन्ट्री', हवालामार्फत व्यवहार?
Pune Police
| Updated on: Mar 08, 2024 | 11:27 AM
Share

पुणे प्रदीप कापसे | दि. 8 मार्च 2024 : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकत्याच केलेल्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत अकरा जणांना अटक केली आहे. या प्रकरणात पंजाब, दिल्लीपासून इंग्लंडपर्यंत कनेक्शन पोलिसांना मिळाले. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आता या प्रकरणाकडे लक्ष दिले आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड संदिप धुने असल्याचे तपासातून पुढे आले आहे. या प्रकरणी संदिप धुने याची प्रेयसी सोनम पंडित आणि संदिप धुने याची आणखी एका मैत्रिणीचा सहभाग मिळाला आहे. या तरुणीच्या मदतीने आर्थिक व्यवहार होत होते. एमडी तस्करी प्रकरणातील आर्थिक व्यवहार हवालामार्फत झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आली आहे.

संदीप धुने याचा शोध सुरु

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले. सुमारे ३.५ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे १८०० किलो एमडी जप्त केले. या प्रकरणात वैभव उर्फ पिंट्या माने, अजय करोसिया, हैदर नूर शेख, भीमाजी परशुराम साबळे, युवराज बब्रुवान भुजबळ, अयुब अकबर शाह मकादर, संदीप राजपाल कुमार, दिवेश चरणजीत भुतानी आणि संदीप हनुमान सिंह यांना अटक केली आहे. मात्र, या कारवाईमागील सूत्रधार संदीप धुनेसह अन्य काही जण फरार आहेत.

आर्थिक व्यवहार करण्यासाठी तरुणीचा वापर

आर्थिक व्यवहार व कायदेशीर मदत करण्यासाठी एका तरुणीचा या रॅकेटमध्ये सहभाग आढळून आला. संदिप धुने याच्या प्रेयसीसह आणखी एक तरुणी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. मास्टरमाईंड असलेल्या संदिप धुने याची प्रेयसी सोनम पंडित हिच्यासोबत संदिप धुने याची आणखी एका मैत्रिणी यामध्ये आहे. त्यांच्या मदतीने आर्थिक व्यवहार होत होते.

धुने याच्याकडे असलेले पैसे या दोघी हवालामार्फत पाठवत असल्याचा संशय पोलिसांना आहे. पुण्यात तयार होणाऱ्या ड्रग्स रॅकेटचे आंतराष्ट्रीय कनेक्शन पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. हा ड्रग्स पंजाबमधून इंग्लंडमध्ये जात होते.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.