AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : OLX वरुन कार घ्यायचा विचार करताय? पुण्यात 6 लाखांचा गंडा घालणाऱ्याला अटक, जाणून घ्या चोरांची मोड्स ऑपरेंडी!

ओएलएक्सवर नेमका लोकांचा कसा गंडा घातला जातोय, याची मोड्स ऑपरेंडीही समोर आली आहे.

Pune Crime : OLX वरुन कार घ्यायचा विचार करताय? पुण्यात 6 लाखांचा गंडा घालणाऱ्याला अटक, जाणून घ्या चोरांची मोड्स ऑपरेंडी!
पुण्यात भामट्याला अटकImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 24, 2022 | 11:24 AM
Share

पुणे : ओएलएक्सवरुन (OLX car Sale) कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, सावधान! कारण पुण्यात कार विक्रीला ठेवून सहा लाख रुपयांची चोरी करणाऱ्याला अटक (Pune Police News) करण्यात आली आहे. चाकण पोलिसांनी (Chakan Police News) मोठ्या शिताफीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी सनी अनिल दाते याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जातेय. त्यांनी अनेकांची फसवणूक केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सनी दाते प्रमाणे अनेकांकडून ओएलएक्सवर गाड्या ठेवून लोकांना गंडवण्याचे प्रकार केले जातात. त्यामुळे लोकांनाही सतर्क राहण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय. तर दुसरीकडे ओएलएक्सवर नेमका लोकांचा कसा गंडा घातला जातोय, याची मोड्स ऑपरेंडीही समोर आली आहे. या चोराला पकडताना पोलिसांनी नेमकं कसं जाळं तयार केलं, त्यावरुन या सगळ्याचा अंदाज येऊ शकतो.

नेमकं काय घडलं?

मिलिंद मधुकर गुंजाळ, वय 32 वर्षे, धंदा नोकरी रा. संगमनेर जि. अहमदनगर यांनी चाकण पोलीस स्टेशन तक्रार नोंदवली होती. सनी अनिल दाते रा. पाषाण पुणे याने OLX अॅपवर मारूती सुझुकी ब्रिझा कार नंबर एम एच 12 पी एच 5554 ही विक्रीसाठी ठेवलेली होती. त्यावेळी मिलिंद गुंजाळ यांना सदर कार आवडल्याने त्यांनी सनी दाते याचे फोनवर फोन करून संपर्क केला. मी आर्थिक अडचणींमध्ये असल्याने मला सदर कार विक्री करायची आहे, असं त्यांनी म्हटलं. तेव्हा मिलिंद गुंजाळ हे सदर कार विकत घेण्यास तयार झाले. त्यांचा 6,70,000/- रु. मध्ये व्यवहार झाल्यानंतर सनी दाते याने 1100/- रूपये टोकनसाठी मागितल्याने त्यांनी 1100/- रू. ऑनलाईन पाठविले.

..आणि गाडी घेऊन पळाला!

त्यानंतर सनी दाते याने मिलिंद गुंजाळ यांना गाडी खरेदीचे रोख रक्कम घेवून मेदनकरवाडी चाकण येथील तिरंगा हॉटेल जवळ बोलावले. तेव्हा मिलिंद गुंजाळ व त्यांचे सहकारी हे गाडी खरेदीसाठी रोख रक्कम घेवून गेले असताना आरोपी सनी दाते याने 6,20,000/- रोख रक्कम घेतली. गाडी आळंदी फाटयावर देतो, असे म्हणून फिर्यादी यांना ब्रिझा गाडीमध्ये आळंदी फाट्यावर घेवून गेला. त्यावेळी त्यांना फसवून गाडीतून खाली झेरॉक्स काढण्यासाठी उतरविले व सनी दाते हा गाडी घेवून पळून गेला. या तक्रारीवरून चाकण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अखेर जाळ्यात अडकला

यानंतर पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी सनी सुनिल दाते यांची माहिती घेण्यास सुरूवात केली. सनी दाते याने फिर्यादीस दिलेल्या पत्त्याचे पाषान पुणे येथील घर दोन वर्षापूर्वी विक्री केलेले असल्याचे समजले. त्यानंतर आरोपीची गोपनीय माहिती तसेच त्याचे मोबाईल नंबरची तांत्रिक माहिती घेवून सदर आरोपीस कारसह अतिशय शिताफिने तळेगाव परीतसरात मुंबई-पुणे महामार्गावरील टोलनाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतले.

आरोपीकडून गुन्हयातील ब्रिझाकार व तसेच फिर्यादी यांचे रोख रक्कम 6 लाख रुपये असा एकूण 12 लाख रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आल. गुन्हयातील आरोपी सनी सुनिल दाते वय 31 वर्षे, रा. सुसगाव पुणे याने OLX Appवर वरील ब्रिझा गाडी विक्रीसाठी ठेवून पुणे परीसरात आणखी ठिकाणी अशा प्रकारे लोकांची फसवणूक केली असल्याचे तपासात समोर आलंय. या बाबत लोकांना आवाहन करण्यात आले आहे की, सनी सुनिल दाते याने अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी संबंधीत पोलीस स्टेशलला तक्रार दाखल करावी.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.