पुण्यात व्यापाऱ्याकडून 130 कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा, जीएसटी विभागाकडून अटक, नेमकं काय घडलं?

राज्य जीएसटी पुणे विभागाने आज (24 जून) पुण्यात 130 कोटींपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी ओमप्रकाश तिरथदास सचदेव या व्यापाऱ्याला अटक केलीय.

पुण्यात व्यापाऱ्याकडून 130 कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा, जीएसटी विभागाकडून अटक, नेमकं काय घडलं?
सांकेतिक छायाचित्र


पुणे : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात आपली कार्यवाही सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून राज्य जीएसटी पुणे विभागाने आज (24 जून) पुण्यात 130 कोटींपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी ओमप्रकाश तिरथदास सचदेव या व्यापाऱ्याला अटक केलीय. जीएसटी पुणे विभागाचे सहायक राज्यकर आयुक्त बी.व्ही. जुंबड यांनी या कारवाईबाबत माहिती दिली (Pune GST department arrest a trader for fraud of 130 crore).

ओमप्रकाश तिरथदास सचदेव या व्यापाऱ्याने मे. श्री वाहेगुरु ग्लोबल माईन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली. याशिवाय मे. ट्रेडर्स भावरे, में. प्रकाश ट्रेडर्स, में. अगरवाल इंटरप्रायजेस, में. कोल्हे सेल्स, में. किरण ट्रेडिंग कंपनी, में. नारायण ट्रेडर्स, में. काशमोरा ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, में. मरीकम्बा ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, में. सिओसिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या इतर व्यक्तींच्या नावे स्थापन करून वस्तू व सेवाकर अधिनियम 2017 अंतर्गत नोंदणी दाखले घेतले.

नेमका घोटाळा काय?

या कंपन्याच्या माध्यमातून ओमप्रकाश तिरथदास सचदेव याने 130.05 कोटी रकमेची खोटी देयके दिली. तसेच 19.79 कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट पुढील खरेदीदारांना दिला. त्याचप्रमाणे हा कर भरायला लागू नये यासाठी अनेक बोगस कंपन्यांचा वापर केला. त्यासाठी कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय दाखवलेल्या बोगस खरेदी देयकांतून सुमारे 22.48 कोटी रकमेचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करून घेतला.

यासाठी काय शिक्षा?

हे कृत्य हे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियमाच्या कलम 132 (ब) व (क) प्रमाणे गुन्हा आहे. 132 (5) प्रमाणे हा प्रकार दखलपात्र व अजामीन पात्र आहे. तसेच कलम 132(1) (i) प्रमाणे या गुन्ह्यासाठी 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.

आरोपी व्यापाऱ्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ओमप्रकाश तिरथदास सचदेव, यास मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांच्या न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याच कारवाई दरम्यान अशा प्रकारच्या बोगस कंपन्यांची माहिती पुणे राज्य वस्तू व सेवाकर विभाग यांना मिळालेली असून त्यांच्याविरुद्ध नजीकच्या कालावधीत कारवाई करण्यात येणार आहे.

अपर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे आणि राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्यकर उपायुक्त दि. भा. देशमुख, सहायक राज्यकर आयुक्त बाबासाहेब जुंबड यांच्या प्रयत्नातून ही अटक कार्यवाही झाली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये सहायक राज्यकर आयुक्त बी.व्ही. जुंबड यांनी दिली आहे.

हेही वाचा :

गुंतवणूकदारांना गंडा, पुण्यातील लंकड रिअ‍ॅलिटी फर्म्सच्या मालकाला अटक

पुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक

धमकी, शिवीगाळ, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातील भाजप नगरसेवकावर गुन्हा

व्हिडीओ पाहा :

Pune GST department arrest a trader for fraud of 130 crore

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI