AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मैत्रिणीशी बोलला… रात्री अचानक ब्लॅक स्कॉर्पिओ आली आणि… MPSCच्या विद्यार्थ्याचं अपहरणाने पुणे हादरलं

पुण्यात MPSC विद्यार्थ्याच्या अपहरणाने खळबळ उडाली आहे. पेरुगेटजवळ प्रसाद सूर्यवंशी या विद्यार्थ्याला मैत्रिणीशी बोलतो म्हणून भररस्त्यात अपहरणकर्त्यांनी मारहाण करून फॉर्च्युनर व स्कॉर्पिओतून पळवून नेलं. पोलिसांनी खबर मिळताच फिल्मी स्टाईल पाठलाग करत प्रसादची सुटका केली. या प्रकरणी दोघांना अटक केली असून, या घटनेमुळे पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीची चिंता वाढली आहे.

मैत्रिणीशी बोलला... रात्री अचानक ब्लॅक स्कॉर्पिओ आली आणि... MPSCच्या विद्यार्थ्याचं अपहरणाने पुणे हादरलं
Pune MPSC Student KidnappedImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 10, 2026 | 11:35 AM
Share

कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असलेलं पुणे शहर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरुगेटजवळूनच या विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आल्याने पुणेकरांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पुणेकर आधीच बेजार झाले आहेत. त्यात आता या नव्या घटनेची भर पडल्याने पुणेकरांची चिंता वाढली असून गुन्हेगारीला पायबंद घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

पेरूगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नारायण पेठेतून या विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आलं आहे. प्रसाद सूर्यवंशी असं या 28 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. प्रसाद रात्री नारायण पेठेत एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत होता. तेवढ्यात एक ब्लॅक फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ आली. या दोन्ही कारमधून एकूण 10 जण उतरले आणि त्यांनी प्रसादला कारमध्ये टाकून फिल्मी स्टाईलने पलायन केले. यावेळी पोलिसांनी कारचा पाठलाग करत प्रसादची सुटका केली. रात्री उशिरापर्यंत हा थरार सुरू होता. पोलिसांनी दोन आरोपी आणि स्कॉर्पिओही ताब्यात घेतली आहे. बाकी आरोपी फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या अपहरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कारण आलं समोर

प्रसाद सूर्यवंशी या विद्यार्थ्याचं अपहरण करण्यामागचं कारण समोर आलं आहे. मैत्रिणीसोबत बोलतो म्हणून प्रसादचं अपहरण करण्यात आलं असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. अपहरण करण्यापूर्वी त्याला भररस्त्यात मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला कारमध्ये जबरदस्ती घुसवून त्याचं अपहरण करण्यात आलं. सिंहगड रोडच्या दिशेने जात असताना परत त्याला मारहाण करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

112 वर कॉल अन् चक्र फिरली

काळ्या स्कॉर्पिओमधून हे गुंड आले होते. विशेष म्हणजे ज्या परिसरातून अपहरण करण्यात आलं, त्याच्या हाकेच्या अंतरावरच पेरूगेट पोलीस चौकी आहे. या तरुणाचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांना 112 क्रमांकावर त्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने स्कॉर्पिओचा पाठलाग करून प्रसादची सुटका केली. पोलिसांनी अत्यंत शिताफीने सागर रमेश बोराडे आणि किशोर बाळासाहेब सावंत या दोन आरोपींनी ताब्यात घेतले. रात्री 1 वाजून 23 मिनिटांनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणातील इतर चार आरोपी फरार आहेत. विश्राम बाग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. दरम्यान, प्रसाद सूर्यवंशी याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.

Follow Us
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क ठोसा...
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क... चकित करणारं कारण समोर
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, तिच्या वडिलांचा जबाब... नेमकं काय घडणार?
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा 'सामना'त खळबळजनक दावा
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एक..
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एकच प्रश्न...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं आमिष दाखवलं की...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं विचित्र आमिष दाखवलं की पीडित...
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट