दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेला कचकन चावला! कुत्रा पाळणं मालकाच्या अंगलट

पळत पळत आला, दुचाकीवरुन जाणाऱ्या तिच्यावर झेप घेतली, दुचाकीच्या स्टेअरीवर असणारे हात त्याने जबड्यात ओढले आणि...

दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेला कचकन चावला! कुत्रा पाळणं मालकाच्या अंगलट
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 10:55 AM

सुनिल थिगळे, TV9 मराठी, पुणे : दुचाकीवरुन जाताना अनेकदा रस्त्यावरचे कुत्रे (Dog bite in Pune) मागे लागल्याचं तुम्ही पाहिलं असेल. गोल फिरणारं चाक दिसलं की त्याच्या मागे धावत सुटायचं, हे कुत्र्यांना (Dog attack) कुणी शिकवायची गरज नसते. म्हणूनच अनेकजण रस्त्यावर कुत्रे दिसले, की एकतर गाडी स्लो करुन त्यांच्यासमोरुन जातात. किंवा मग पटकन त्यांच्यासमोरुन पळ काढून वेगाने दुरुनच पुढे निघून जातात, किंवा वाट तरी बदलतात. अशातच पुण्यात (Pune Crime News) घडलेल्या एका घटनेनं दुचाकीवरुन जाणारे अधिकच धास्तावलेत.

घटना आहे पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील. एका महिला दुचाकीवरुन जात होती. त्यावेळी एक कुत्रा पळत पळत आला आणि त्याने या महिलेचा चावा घेतला. यात महिला जखमी झाली. विशेष म्हणजे जो कुत्रा चावला, तो काही रस्त्यावरचा कुत्रा नव्हता. हा एक पाळलेला कुत्रा होता.

पाळीव कुत्र्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेवर हल्ला केला. तिच्या हाताचा चावा घेतला. यात महिलेच्या हाताला गंभीर जखम झाली. घडलेल्या प्रकारनंतर महिलेनं अखेर पोलिसात तक्रार दिलीय. त्यानंतर या पाळीव कुत्र्याच्या मालकावर गुन्हा नोंदवण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

शिरु तालुक्यात आंबळे येथे तक्रारदार महिला दुचाकीवर जात होती. त्यावेळी आंबळे येथळी निमोणे रस्त्यावर ही घटना घडली. महिला दुचाकीवर जात असताना आरोपीचा पाळीवर कुत्रा पळत पळत आला. दुचाकीच्या हॅन्डलवर असलेल्या महिलेच्या हाताला कुत्र्याने आपल्या जबड्यात घेतलं आणि तो कचकन चावला.

शिरुर तालुक्यात या घटनेमुळे दुचाकीवरुन जाताना कुत्र्यांपासून सावध राहण्याची गरज व्यक्त केली जातेय. तसंच पाळीव कुत्र्यांना फिरवण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मालकांनीही आपल्या कुत्र्यांना शिस्त लावण्याची आणि अधिक खबरादीर बाळगण्याचं आवाहन केलं जातंय. दरम्यान, शिरुर पोलीस स्थानकात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार आता पुढील तपास केला जातोय.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.