डिव्हायडरला धडकून भरधाव कार विरुद्ध दिशेला घुसली! कारमधील 4 जणांचं काय झालं?

पुण्याला जाण्यासाठी ते साताऱ्याहून निघाले, वाटेत कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडर ओलांडून थेट विरुद्ध लेनमध्ये घुसली

डिव्हायडरला धडकून भरधाव कार विरुद्ध दिशेला घुसली! कारमधील 4 जणांचं काय झालं?
अपघातानंतर बघ्यांची गर्दीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 8:02 AM

विनय जगताप, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, पुणे : राज्यातील रस्ते अपघाताचं (Maharashtra Raod accident) सत्र सुरुच आहे. पुणे सातारा महामार्गावर (Pune Satara Accident) भीषण अपघात झाला. एक कार डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्येच घुसली. इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) या कारमधून चौघेजण प्रवास करत होते. या चारही जणांचा जीव अगदी थोडक्यात वाचलाय. विरुद्ध दिशेने कोणतंही वाहन येत नव्हतं, त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. या अपघातामुळे कारमधील चारही जणांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

पुणे सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाजवळ कारचा अपघात झाला. पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यानं कार दुभाजक ओलांडून विरुद्ध लेनमध्ये गेली आणि अपघात घडला. सुदैवानं यावेळी समोरुन कोणतीही गाडी येत नव्हती. अन्यथा समोरासमोर धडक होऊन मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय यावेळी कारमधील चारही जणांना आला.

एअरबॅगमुळे वाचले!

डिव्हायडरला कार धडकल्यानंतर कारमधील एअरबॅग वेळीच उघडले आणि त्यामुळे कारमधील प्रवाशी अगदी थोडक्यात वाचले. अपघातग्रस्त कारमधील चारही जणांचा जीव वाचला असाल तर त्यांना जखमा झाल्या आहेत. MH 12 GM 5800 क्रमांकाच्या कारने चौघेजण साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला.

हे सुद्धा वाचा

या अपघातात कारचं बोनेट, दरवाजा यांना जबर फटका बसून मोठं नुकसान झालं. एअरबॅग जर वेळीच उघडले नसते, तर या कारमधील चारही जणांचं काय झालं असतं, याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी होती. या अपघातानंतर कारची झालेली अवस्था पाहून कारमधील प्रवासीही हादरुन गेले होते.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतर कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. कार अपघातामुळे पुणे-सातारा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती.

मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रागा पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर लागल्या होत्या. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अखेर पोलिसांनी अपघातग्रस्त कार रस्त्यावरुन हटवली आणि त्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.