
पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. सासवडमध्ये दोन खून झाले आहेत. एकतर्फी प्रेमातून एकाने प्रेयसीच्या नवऱ्याचा केला खून केल्याचे समोर आले आहे. तर आणखी एका घटनेत किरकोळ वादातून दोघांनी एकाची हत्या केली आहे. या घटनांमुळे सासवड परिसरात खळबळ उडाली आहे. ही दोन्ही प्रकरणे काय आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पहिल्या घटनेत दोघांनी किरकोळ वादातून एकाची हत्या केली आहे. राजू दत्तात्रय बोराडे अस मयत व्यक्तीचे नाव आहे. 9 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांची हत्या झाली होती. राजू यांचा भाऊ गजानन दत्तात्रय बोराडे यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, राजू बोराडे यांच्यावर हल्ला झाला होता. 9 तारखेला त्याचा खून झाला होता, तेव्हापासून सासवड पोलिस आरोपीचा शोध घेत होते. 7 दिवस आरोपीचा शोध सुरू होता, त्याला पकडण्यासाठी काही सापळे रचण्यात आले होते. संशयित इसम आम्हाला दारू खरेदी करताना आढळून आला होता.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि मयत व्यक्ती वाईन शॉपच्या पाठीमागे बसले होते, त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला यात आरोपी सूरज निषाद आणि नीरज गोस्वामी यांनी राजूवर हल्ला केला. खून झालेल्या व्यक्तीची आणि आरोपीची ओळख नव्हती. मात्र दारू पिताना वाद झाला त्यामुळे या दोघांनी त्याचा खून केला. दोन्ही आरोपी चाकूने हल्ला करून मृतदेहाला चाकूने भोसकत होते अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
आणखी एका घटनेत 14 तारखेला सासवडमध्ये एक मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह दिपक जगताप याचा होता.सुशांत मापारे याने दिपक जगताप याचा खून केला होता. याबाबत पोलिसांनी तपास केला असता एकतर्फी प्रेमातून ही घटल्याचे समोर आले आहे. आरोपी अनेक दिवसापासून मयत व्यक्तीच्या पत्नीच्या मागे होता. मात्र तिचे लग्न झाल्यानंतर त्याने तिच्या नवऱ्याचा खून केला. आता पोलिसांनी सुशांत मापारे याला ताब्यात घेतले आहे. सुशांतला मृत व्यक्तीच्या पत्नीशी लग्न करायचे होते, मात्र तिचे लग्न दुसऱ्याशी झाल्यामुळे त्याला राग आला होता. याच रागातून त्याने दीपक जगतापचा खून केला आहे .