AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढच्या काही तासांत…ते नालायक.., वैष्णवी प्रकरणात फरार सासरा-लेकाबाबत उदय सामंतांचं मोठं आश्वासन; काय म्हणाले?

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

पुढच्या काही तासांत...ते नालायक.., वैष्णवी प्रकरणात फरार सासरा-लेकाबाबत उदय सामंतांचं मोठं आश्वासन; काय म्हणाले?
uday samant on vaishnavi hagawane suicide case
| Updated on: May 22, 2025 | 5:05 PM
Share

Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तिच्या लग्नात माहेरच्यांनी तब्बल 51 तोळे सोनं दिलं होतं. तसेच एक फॉर्च्यूनर कारही दिली होती. मात्र सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून तिने जीवन संपवलं आहे. याच प्रकरणात आता शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्री उदय सामंत यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांना मोठं आश्वासनं दिलं आहे.

मूक व्यक्ती एखाद्या पक्षात असली म्हणजे..

वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उदय सामंत यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. हा नीचपणाचा तसेच क्रुरतेचा कळस आहे. या प्रकरणात ज्यांचा हात आहे, त्यांना कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन सामंत यांनी दिले. तसेच अमूक व्यक्ती एखाद्या पक्षात असली म्हणजे त्या व्यक्तीला काहीही करायचा परवाना मिळत नाही, असंही सामंत यांनी म्हटलंय.

आरोपांनी शिक्षेपर्यंत नेलं पाहिजे

हा निर्घृणतेचा कळस आहे. हा अमानुषपणा आहे. मी राजकीय पुढारी आहे, मी नेता आहे, मी कुठल्यातरी पक्षात काम करतोय म्हणून मला अशी कुकृत्ये करण्याची मुभा आहे, असं चित्र भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी वैष्णवी हगवणेच्या आत्महत्याप्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. आरोपांनी शिक्षेपर्यंत नेलं पाहिजे, असं मतही उदय सामंत यांनी व्यक्त केलं.

पुढच्या काही 24 तासांत…

अशी प्रवृत्ती ठेचली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. या प्रकरणात ज्या दोन व्यक्ती फरार आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी सहा पथकं तयार करण्यात आली आहेत. पुढच्या काही 24 तासांत त्यांना तुरुंगात टाकण्यात पोलीस यशस्वी होतील. त्यांनी जो नीचपणा केला आहे, तो पहता त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असंही मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.