AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime| यवत पोलिसांची मोठी कारवाई ; दहा लाख रुपये किंमतीचा 167.25 किलोग्रॅम गांजा जप्त; 12आरोपी अटक

पुणे महामार्गावर दोन मालवाहतुक करणारे ट्रक हे आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून येत असून ते पुणे येथे गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहीती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी छापा घालण्यासाठी पोलिसांची दोन पथक तयार केली. आज पहाटेच्या सुमारास दौंड तालुक्यातील पाटस गावापासून काही अंतरावर सर्व्हिस रोडच्या कडेला सापळा लावून दोन मालवाहतुक करणारे ट्रक ताब्यात घेतले.

Pune crime| यवत पोलिसांची मोठी कारवाई ; दहा लाख रुपये किंमतीचा 167.25 किलोग्रॅम गांजा जप्त; 12आरोपी अटक
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 4:04 PM
Share

पुणे – दौंड तालुक्यातील यवत पोलिसांनी आंतरराज्य व राज्याअंतर्गत गांज्याची वाहतूक व विक्री करणारी टोळीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकुण 6 पिशव्यामध्ये एकुण 167.25 किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. या गांजाची एकूण लाख दहा हजार पाचशे रुपये किमतीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे जेरबंद केलेल्या टोळीत पाच महिलांचा सहभाग आहे. कारवाई दरम्यान या टोळीकडून तब्बल अठठ्यात्तर लाख दहा हजार पाचशे रुपये किंमतींचा मुद्देमाल जप्त केला आहे..

अशी केली कारवाई यवत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की,यवत स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना गुप्त बातमी मिळाली की सोलापुर- पुणे महामार्गावर दोन मालवाहतुक करणारे ट्रक हे आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून येत असून ते पुणे येथे गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहीती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी छापा घालण्यासाठी पोलिसांची दोन पथक तयार केली. आज पहाटेच्या सुमारास दौंड तालुक्यातील पाटस गावापासून काही अंतरावर सर्व्हिस रोडच्या कडेला सापळा लावून दोन मालवाहतुक करणारे ट्रक ताब्यात घेतले. या दोन्ही ट्रकची झडती घेतली असता दोन्ही गाडयामध्ये ड्रायवर सीटच्या बाजुला एकूण 6  पिशव्यामध्ये वेगवेगळया बंद पाकीटात एकुण 167.25 किलोग्रॅम असा तीस लाख दहा हजार पाचशे रुपये किंमतीचा गांजा व गुन्हयात वापरते दोन मालवाहतूक करणारे48 लाख रुपये किंमत असा एकुण 78, लाख दहा हजार पाचशे रुपये किंमतींचा गुन्हयामध्ये मुद्देमाल जप्त करुन 7 पुरुष 5 महिला असे एकुण 12आरोपी अटक केले आहेत. NDPS कायद्याअंतर्गत सर्व आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

2 गावठी पिस्टलासह 3 जिवंत काडतुसे जप्त

दुसरीकडे बारामती तालुका पोलिसांनी 2 गावठी पिस्टलासह 3 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. बारामतीमध्ये लाल रंगाच्या स्विफ्ट गाडीमध्ये पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी माहितीची खातर जमा करत सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी धर्मराज पोपट वाघमारे हा पिस्तूल विक्रीला घेऊन आला असता पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशान करून त्याला पकडले. आरोपीवर भारतीय शस्त्र अधिनियम 5(25 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश आंबेडकर हे ‘रिपब्लिकन’ नाहीत, जोगेंद्र कवाडे यांचं रिपाइं ऐक्यावरही मोठं विधान

Ram Gopal Varma on RRR : राम गोपाल वर्मांनी Omocron आणि RRRच्या रिलीजविषयी दिली प्रतिक्रिया, सरकारला केली ‘ही’ विनंती

Nashik Corona | जिल्ह्यात कोरोनाच्या 447 रुग्णांवर उपचार सुरू; नाशिक महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 250 बाधित

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.