AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिकअप बाईकचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू, त्यामध्ये दोन चिमुकल्यांचा…

जखमींवरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

पिकअप बाईकचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू, त्यामध्ये दोन चिमुकल्यांचा...
Car jeep AccidentImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 28, 2023 | 8:32 AM
Share

आळेफाटा : शेतीची कामे आटोपून घरी निघालेल्या शेतमजूर लोकांना भरधाव वेगाने निघालेल्या पिकअप (Pickup) जीपने जोराची धडक दिली. ज्यावेळी धडक दिली त्यावेळी अपघातस्थळी जोराचा आवाज आला. ही घटना नगर कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे घडली आहे. दुचाकीवर निघालेल्या आठ जणांना (Car jeep Accident) धडकी दिली. त्यापैकी एकाचा जागीचं मृत्यू झाला आहे. तर उपचार सुरु असताना चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. शेतीचं काम संपवून सगळे शेतमजून आपल्या पारनेर (Parner) या गावी निघाले होते अशी माहिती मिळाली आहे.

अपघातामुळे परिसर हादरला

पुणे नगर कल्याण महामार्गावर पिकअप जीप दुचाकीच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. नारायणगाव येथुन शेतमजुरीची कामे उरकुन पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे घराकडे जात असताना शेतमजुरांना नगर कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे पिकअप जीपने दुचाकीवरील आठ जणांना जोराची धडक दिली. त्यामध्ये चिमुकल्यांसह एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान तीन असे पाच जणांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे.

रात्रीच्या अंधारात पिकअप जीपने चिरडले

दोन चिमुकली, दोन पुरुष, एक महिला यांचा समावेश आहे. मृत्यु झालेले सर्व शेतमजुर असून शेतमजुरीचे काम संपवुन सर्व पारनेर तालुक्यातील गावाला जात असताना रात्रीच्या अंधारात पिकअप जीपने चिरडल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जखमींवरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. गाडी चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गाडी चालकाची कसून चौकशी करण्यात येणार आहे.

Follow Us
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.