Pune Crime : नंबर प्लेट नसलेल्या बुलेटवरून आले अन् सोन्याची चेन खेचून फरार झाले.. तीन घटनांनी पुणं हादरलं !

पुण्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी, लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. हे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून त्या फुटेजच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Pune Crime : नंबर प्लेट नसलेल्या बुलेटवरून आले अन् सोन्याची चेन खेचून फरार झाले.. तीन घटनांनी पुणं हादरलं !
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 1:49 PM

पुणे | 20 सप्टेंबर 2023 : विद्येचे माहेरघर अशी ख्याती असलेल्या पुण्यात सध्या गणेशोत्सवाचा (ganeshotsaw) उत्साह पहायला मिळत आहे. मंगळवारी राज्यभरासह पुणे शहरातील घरांघरात गणरायाचे आगमन झाले. सार्वजनिक गणपतींचे, मानांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नागरिक बाहेरही पडले होते. मात्र याच सुमारास गुन्ह्यांच्या (crime in pune) घटनेने शहर हादरल्याचे दिसून आले. पुण्याच्या भोर तालुक्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी, नंबर प्लेट नसणाऱ्या बुलेटवरून आलेल्या चोरांच्या दुकलीने महिलांच्या पर्स आणि गळ्यातील चेन खेचून चोरल्याच्या घटना (theft news) घडल्या आहेत. या प्रकरणातील तिनही फिर्यादी महिलांनी भोर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. चोरट्यांची ही दुक्कल भोरमधील चौपाटी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याच फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या चोरीने पसरली घबराट

भोर तालुक्यातील भोर-मांढरदेवी मार्गावर नंबर प्लेट नसलेल्या हिरव्या रंगाच्या बुलेटवर आलेल्या दोन चोरट्यांनी ही चोरी केली. वेगगेवगळ्या परिसरातून त्यांनी तीन महिलांच्या हातातील पर्स आणि गळ्यातील सोन्याचे दागिने खेचले आणि ते फरार झाले. मंगळवारी सकाळच्या सुमारास गणेश चतुर्थीच्याच दिवशी मुख्य रहदारीच्या रस्त्यावर सुमारे अर्ध्या तासात तीन ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे परिसरात घबराट पसरली आहे.

याबाबत भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास तौसीफ शेख हे पत्नी हीनासोबत बाईकवरू भोर येथून वाईच्या दिशेने निघाले होते. भोर-मांढरदेवी मार्गावरील अंबाडखींड घाट सुरु झाल्यानंतर खाणीशेजारी पाठीमागून बुलेटवर आलेल्या दोघांनी त्यांना ओव्हरटेक करताना पाठीमागे बसलेल्या हिना शेख यांच्या हातातील पर्स आणि गळ्यातील सोन्याची चेन खेचली आणि ते फरार झाले. पर्समध्ये तीन हजार रुपयांच्या रोख रकमेसह बँकेची व इतर काही महत्वाची कागदपत्रे होते.

तर दुसऱ्या घटनेत सुवर्णा माने या त्यांच्या मुलासह पुण्याहून मांढरदेवीच्या दर्शनाला जात असतानाच अंबाडखींड घाटाकडे जाण्यासाठीच्या वळणावर समोरून बुलेटवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीसमोर बुलेट थांबवली. आणि अवघ्या काही क्षणातच त्यांच्या गळ्यातील पर्स हिसकावून घेतली. पर्समध्ये 5 हजार रुपये, आधार कार्ड आणि एटीम कार्डसह इतर महत्वाची कागदपत्रं होती.

अशीच तिसरी घटना नेरे गावच्या जवळ वरोडी ब्रुद्रुक येथे घडली. येथील आनंदा तुपे हे पत्नी वनिता आणि मुलासह भोरला जात असतानाच चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. आणि पाठीमागे बसलेल्या वनिता तुपे यांच्या हातातील पर्स हिसकवली. त्यावेळी वनिता खाली पडल्या आणि त्यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली. चोरट्यांनी त्यांच्याही गळ्यातील 50 हजार रुपये किमतीच सोन्याचं मंगळसूत्र हिसकावलं. समोरील तरूणांनी त्यांना थांबवण्याचा प्रय्तन केला, मात्र ते अयशस्वी ठरले.

अखेर चोरीच्या या प्रकरणी भोर पोलिस ठाण्यात तीनही व्यक्तींनी तक्रार नोंदवली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.