Pune Bus Rape Case : बलात्कार प्रकरण तपासात पुणे पोलीस आयुक्तांची मोठी कबुली
Pune Bus Rape Case : "निर्जनस्थळी, एसटी स्टँड , रेल्वे स्थानक, डार्क स्पॉट, टेकडी स्पॉट, हॉटस्पॉटचे सेफ्टी ऑडिट सुरू आहे. पालिका आणि इतर विभागाशी मिळून डार्क स्पॉटच्या इथे दिवे लावणार आहे" अशी माहिती अमितेश कुमार यांनी महिला सुरक्षेविषयी दिली.

“काल रात्री स्वारगेट डेपोतील बस अत्याचार प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतलं. त्याला गुनाट गावातून पथकाने ताब्यात घेतलं. तीन दिवसापासून ऑपरेशन सुरु होतं. स्वारगेट पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांच अंदाजे 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ऑपरेशनमध्ये होते. स्थानिक नागरिक 400 ते 500 लोकांचं सहकार्य मिळालं. आमचे डॉग स्क्वॉड वेगवेगळ्या ठिकाणी गेले. ऊसाचं शेतं श्वानाने दाखवले होते. ड्रोनचा वापर करून आरोपी ट्रेस झाला होता. या प्रयत्नानंतर काल 1 वाजून 10 मिनिटाने आरोपीला ताब्यात घेतलं. सकाळी प्रक्रिया पूर्ण करून अटक केली. आता कोर्टात उभं करु” असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.
“एक विशेष पथक तपासासाठी तयार केलं आहे. पुरावे तयार केले जात आहेत. स्पेशल कौन्सिलची नियुक्ती होणार आहे. फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवणार. क्राइम बांचचे जे वेगवेगळे पथक स्वागर गेट पथक आणि झोन चू टे वनेगवेगळ पथकर असे मिळून अंदाजे 500 पोलीस कर्मचारी या ऑपरेशनमध्ये होते” अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. “महिलांच्या सुरक्षेविषयी एक आढावा घेतला. निर्जनस्थळी, एसटी स्टँड , रेल्वे स्थानक, डार्क स्पॉट, टेकडी स्पॉट, हॉटस्पॉटचे सेफ्टी ऑडिट सुरू आहे. पालिका आणि इतर विभागाशी मिळून डार्क स्पॉटच्या इथे दिवे लावणार आहे. “मार्शलकडून निर्जनस्थळी क्यूआरकोड मॅपिंग केली जाणार आहे” अशी माहिती अमितेश कुमार यांनी महिला सुरक्षेविषयी दिली.
मदत करणाऱ्या नागरिकांचं अभिनंदन करणार
‘आरोपीला अटक करण्यात उशीर झाला आहे. तीन दिवस लागले’ अशी कबुली अमितेश कुमार यांनी दिली. “पहिल्या दिवशी फिर्याद आल्यावर दीड ते दोन तासात वेगवेगळ्या टीम कामाला लागल्या. 23 सीसीटीव्ही कॅमेरे एसटी स्टँडच्या आतील भागातील. 48 कॅमेरे बाहेरचे तपासले. दीड ते दोन तासाच आरोपीचं नाव निष्पन्न केलं. तांत्रिक पुरावा गोळा केला. त्यात आमचे पथक गुनाट गावात दोनच्या सुमारास पोहोचलं होतं. पूर्ण प्रयत्न करून आरोपी सापडला नाही. काल अखेर पकडला. गावातील नागरिकांनी सहकार्य केलं. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. मदत करणाऱ्या नागरिकांचं अभिनंदन करणार आहोत” असं अमितेश कुमार म्हणाले.
