AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजाच्या खुनाचा सस्पेन्स संपला, ती शंका खरीच ठरली, अखेर धक्कादायक सत्य आलं समोर!

राजा रघुवंशी हत्याकांडात पोलिसांना मोठी आणि महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या खुनाचा खरा मारेकरी कोण होता, हे आता समोर आले आहे.

राजाच्या खुनाचा सस्पेन्स संपला, ती शंका खरीच ठरली, अखेर धक्कादायक सत्य आलं समोर!
raja raghuvanshi and sonam raghuwanshi (5)
| Updated on: Jun 11, 2025 | 5:54 PM
Share

Raja Raghuvanshi Nurder Case : राजा रघुवंशी हत्याकांडात रोज नवनवे खुलासे होत आहेत. सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सोनम ही राजा रघुंवशी याची पत्नी आहे. सोबतच या खुनात मदत करणाऱ्या इतरही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुरुवातीला सोनम रघुवंशी मी राजाचा खून केलेला नाही. उलट माझंच अपहरण करण्यात आलं, असा दावा सोनम करत होती. आता मात्र या खून प्रकरणातील सर्व रहस्य समोर आले आहेत. या खुनाची खरी मारेकरी सोनम हीच असून तिने मीच माझ्या नवऱ्याचा खून केल्याचं कबूल केलं आहे.

सोनमने केला गुन्हा कबूल

राजा रघुवंशी खून प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. या पाचही आरोपींना शिलाँग येथील न्यायालयात हजर करण्यात आलंय. त्याआधीच मेघालय पोलिांनी मोठी आणि धक्कादायक अशी माहिती दिली आहे. मेघालय पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोनमने राजा रघुवंशीची हत्या केल्याचं कबुल केलं आहे. या प्रकरणात सोनम हिच्यासोबत राज कुशवाहा हादेखील मुख्य आरोपी आहे. राज कुशवाहा हा सोनमचा कथित प्रियकर आहे.

प्रकरणाचा तपास कसा केला?

शिलाँगचे एसपी विवेक स्येम यांनी या प्रकरणाचा तपास कसा केला, याबाबत माहिती दिली आहे. “या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. या तपासात आम्ही खूप सारा डेटा मिळवला. या डेटाचा तपासही केला. हा तपास केल्यानंतर आमच्यापुढे सर्व चित्र स्पष्ट झालं. राजा रघुवंशीच्या खुनामागे ब्लॅकमेलिंग, लूट अशी वेगवेगळी कारणं असल्याचा अंदाज लावला जात होता. आमच्या हाती काही पुरावे लागले आहेत,” असं विवेक स्येम यांनी सांगितले आहे.

मी राजाच्या हत्याकांडात सहभागी होते

राजा रघुवंशीचा खून झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीला अनेक पुरावे आढळले. याच एसआयटीने राजा कुशवाहा आणि सोनम रघुवंशी या दोघांचाही आमनेसामने चौकशी केली. याच चौकशीदरम्यान सोनमने राजाची हत्या केल्याचं कबुल केलं. तपासात आढळलेले आलेले सर्व पुरावे समोर ठेवल्यानंतर सोनमने मी राजाच्या हत्याकांडात सहभागी होते, असं कबूल केलं आहे. या प्रकरणात राजा कुशवाहा, सोमन हिच्यासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आलं आहे. उर्वरित तिघे हे सुपारी किलर्स आहेत. त्यांची नावे आनंद, आकाश राजपूत आणि विशाल उर्फ विक्की ठाकूर अशी आहेत.

सगळे आरोप पकडले, चौकशी सुरू

सोनम हिला उत्तर प्रदेशमधून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. तर राजा कुशवाह आणि विशाल या दोघांना इंदौर येथून पकडलं होतं. आकाश राजपूत हा मध्य प्रदेशात पोलिसांच्या हाती लागला. आनंद याला उत्तर प्रदेशातील ललितपूर येथून अटक करण्यात आली. या तिन्ही सुपारी किलर्सने राजाचा खून केल्याचं कबूल केलं आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.