हॉटेल, 4 मारेकरी अन् ते 7 तास, राजाच्या खुनाचा कट कसा शिजला; सोनमचा भयानक कांड पहिल्यांदाच समोर!
सध्या राजा रघुवंशी याची हत्या त्याच्याच बायकोने केल्याचं समोर आलंय. सोनम रघुवंशीने आपल्या मित्रांना सोबत घेऊन हे हत्यांकांड घडवून आणलंय.

Raja Raghuwanshi Murder Case : मधुचंद्र साजरा करण्यासाठी गेलेल्या मध्य प्रदेशातील राजा रघुवंशीचा निर्घृण खून करण्यात आला. त्याच्या पत्नीनेच त्याचा काटा काढल्याचा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे त्याचा मृतदेह खोल दरीत सापडल्याने या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा होत आहे. राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी हिने मात्र मी माझ्या नवऱ्याचा खून केलेला नाही, असं म्हटलंय. दरम्यान, तिने खून केल्याचं नाकारलं असलं तरी आता राजाच्या खुनाचा कांड समोर आलाय. चार माणसांच्या मदतीने राजाला कसं संपवलं गेलं, याचं खळबळजनक सत्य समोर आलं आहे.
सोनमच्या हत्येचं धक्कादायक सत्य समोर
मिळालेल्या माहितीनुसार राजा रघुवंशीची पत्नी सोनम हिनेच त्याच्या खुनाचा कट रचला होता. या प्रकरणात पोलीस जसंजसं तपास पुढे नेत आहेत तसंतसं अनेक धक्कादायक सत्य समोर येत आहेत. सध्या सोनम रघुवंशी ही शिलाँगमध्ये आहे. ती पोलिसांच्या ताब्यात असून तिची चौकशी केली जात आहे.
23 मे रोजी नेमकं काय घडलं?
मेघालयातील पोलिसांनुसार राजा रघुवंशी याची 23 मे रोजी हत्या झाली. 23 मे रोजी सकाळी 5.30 वाजता राजा रघुवंशी, सोनम आणि तीन मारेकरी (अज्ञात मारेकरी) यांनी शिप्रा हॉटेलमधून चेकआऊट केलं. त्यानंतर सकाळी सहा वाजता सोनम आणि राजा यांनी डोंगरावर चढायला सुरुवात केली. मात्र यावेळी सोनम रस्त्यातच उतरली आणि तिने किलर्सची संपर्क केलं. सकाळी सात वाजता सोनम आणि राजा हे एका दुकानाजवळ चहा पिण्यासाठी थांबले. यावेळी राजाचे मारेकरीही त्यांच्या आसपासच होते. सकाळी 10 वाजत सोनम आणि राजा हे 2000 पायऱ्या चढले. याच दरम्यान, एका टुरिस्ट गाईडन तिन्ही मारेकऱ्यांना एकत्र पाहिलं होतं.
राजाशी मैत्री आणि खून
दुपारी बारा वाजता राजा रघुवंशी याची मारेकऱ्यांशी मैत्री झाली. मैत्रीनंतर राजा आणि मारेकरी सोबत चालू लागले तर सोनम ही त्यांच्या मागे-मागे चालू लागली. दुपारी साडे बारा वाजता सोनमने आपल्या सासूला कॉल केला. डोंगर चढत असताना थकवा येतोय, असं सोनमने आपल्या सासूला सांगितले. त्यानंतर दुपारी एक ते दीड वाजादरम्यान सोनमने मारेकऱ्यांना एक इशारा केला. त्यानंतर मारेकऱ्यांपैकी वाशाल नावाच्या आरोपीने राजावर पहिला हल्ला केला. त्यानंतर दुपारी 2.15 वाजता सोनमने राजाचा फोन घेऊन सोशल मीडियावर एक दु:ख व्यक्त करणारी एक पोस्ट केली. त्यानंतर त्याने फोनला खाईत फेकून दिलं. राजाची हत्या केल्यानंतर हा फोन खाईत फेकून देण्यात आला.
खून केल्यानंतर नेमकं काय केलं?
दरम्यान, 23 मे रोजी राजा रघुवंशी याची हत्या झाल्यानंतर 24 मे रोजी त्याची बायको सोनम फरार झाली. त्यानंतर ती 25 मे रोजी इंदौरमध्ये राज कुशवाहा याला भेटली. 9 जून रोजी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे सोनम पोलिसांकडे गेली. तिने आत्मसमर्पण करण्याआधी आपल्या भावाशी फोनद्वारे संपर्क केला. फोनवर ती रडत होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 10 जून रोजी तिला न्यायालयापुढे हजर करण्यात आलं. तिला तीन दिवसांची कोठडी मंजूर करण्यात आली. 11 जून रोजी सोनमला पाटण्याहून शिलाँगला नेण्यात आलं. दरम्यान, आता या प्रकरणात पुढे काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.