भयानक, शौचासाठी गेलेल्या महिलेला उचलून नेलं, धावत्या गाडीमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार, नंतर 11 दिवस…
एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासण्याच हे प्रकरण आहे. एका विवाहित महिलेला भयानक अनुभवातून जावं लागलं आहे. महिला सुरक्षेसासाठी कायदे कितीही कठोर बनवले, तरी अशा घटना घडतच असतात.

महिलांविरोधात घडणारे गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे बनवण्यात आले आहेत. पण तरीही महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात महिलांना अत्याचाराला सामोर जावच लागतय. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेसोबत अमानुष घटना घडली आहे. गावातील एका विवाहितेवर सात नराधमानी मिळून धावत्या गाडीत सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी 11 दिवस पीडितेला बंधक बनवून ठेवलं. तिच्यावर आळीपाळीने ते अत्याचार करतच होते. पीडित महिला तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. पण पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. राजस्थानच्या अलवरमध्ये तिराया पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली.
त्यानंतर पीडित महिला आणि तिचे कुटुंबिय कोर्टात गेले. त्यानंतर कोर्टाच्या आदेशावरुन FIR दाखल झाली. पीडित महिलेने सांगितलं की, 25 एप्रिल 2025 रोजी ती शौचासाठी बाहेर गेली होती. त्यावेळी बोलेरोमधून आलेल्या सात जणांनी तिला बंधक बनवलं. आरोपी तिला जबरदस्तीने पनियाला रोड येथे घेऊन गेले. तिथे गाडीत सर्व आरोपींनी आळी पाळीने तिच्यावर बलात्कार केला.
तिच्या तोंडात कपड्याचा बोळा भरला
तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आरोपींनी तिच्या तोंडात कपड्याचा बोळा भरला. पीडितेने सांगितलं की, आरोपींनी तिला 11 दिवस बंधक बनवून ठेवलं. सतत तिच्यावर अत्याचार करत होते. या दरम्यान आरोपींनी तिचे अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. 11 दिवसांनी आरोपी तिला बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून पसार झाले.
पीडितेला तिथून पळवून लावलं
त्यानंतर पीडित महिला कशीतरी आपल्या घरी पोहोचली. तिने कुटुंबियांना या घटनेबद्दल सांगितलं. कुटुंबीय घाबरले. त्यानंतर काहीवेळाने कुटुंबीय आणि पीडित महिला घटनेची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिला. पीडितेला तिथून पळवून लावलं.
न्यायासाठी पोलीस स्टेशनला फेऱ्या
अशा परिस्थितीत पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाने कोर्टाचा दरवाजा ठोठावला. कोर्टाच्या आदेशावरुन 2 जून 2025 रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पण आरोपी अजून फरार आहे. पीडित महिला न्यायासाठी पोलीस स्टेशनला फेऱ्या मारत आहे.
