अरे हा बाप आहे की राक्षस…? पोटच्या गोळ्यालाही सोडलं नाही, बलात्कार करून हत्या; त्या घटनेनं शहर हादरलं
अल्पवयीन मुलीवर बल्काकार आणि हत्या प्रकरणात 14 वर्षांचा तुरुंगवास भोगूनही सुधरला नाही, बाहेर येताच दत्तक मुलीसोबत नको ते कृत्य... जाणून व्हाल हैराण

हे कलियुग आहे! कधी काय होईल सांगता येत नाही… कोण कोणाचा कधी आणि कसा घात काहीही सांगता येत नाही. कलियुगात असंख्य गोष्टी बदलल्या आहेत. तर दुसरीकडे मुली आणि महिलांचं आयुष्य कठीण झालं आहे. कधी कोणत्या क्षणी आणि कोण स्वतःच्या मर्यादा विसरेल काहीही सांगता येत नाही. अशात महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न देखील याठिकाणी उपस्थित होतो. गुन्हेगार शिक्षा भोगून देखील सुधारणात नाही… शिक्षा भोगून आल्यानंतर देखील मोठा गुन्हा करतो… ज्यामुळे परिसरात खळबळ माजते… असंच काही झालं आहे, राजस्थान येथे..
राजस्थान येथील भरतपूरच्या पोलिसांनी बिहार येथील राहणारा एक आरोपी ज्याने आधिच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपात 14 वर्ष तुरुंगवास भोगला आहे… सांगायचं झालं तर, प्रत्येक माणूस आपल्या चुकांमधून शिकत असतो… पण या आरोपीने सर्व मर्यादा ओलांडल्या… तर काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या…
मोहममद अरशत… एक असा गुन्हेगार ज्याने 2007 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 14 वर्षांची शिक्षा भोगून आल्यानंतर देखील गुन्हेगार सुधारला नाही… तुरुंगातून आल्यानंतर त्यांना 15 वर्षांच्या मुलीसोबत नको ते कृत्य केलं, जिला त्याने दत्तक घेतलं होतं.
मुलीवर करत राहिला बलात्कार…
सांगितलं जातं की, मोहम्मद अरशद 2024 मध्ये तुरुंगातून सुटला. त्यानंतर त्याने 15 वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलं आणि तिच्या जबाबदारीचं वचन दिलं. . पण तो राक्षस दीड वर्ष अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत राहिला. आरोपी पीडितेला धमकावत असे की ती कोणालाही सांगू नको आणि तो स्वतः तिला शाळेत सोडायचा आणि घरी घेवून यायता. अस्वस्थ झालेल्या पीडितेने तिच्या आईला घडलेली सर्व घटना सांगितली…
25 जून 2025 रोजी पीडितेच्या आईने शिवर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे… याची चाहूल लागताच आरोपी फरार झाला आणि त्याला पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलं. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याच्या विरोधात कारवाई सुरु आहे.
