5 मुलांची एकच बायको, सासऱ्याचा मधुचंद्र…, हा सिनेमा पाहून सगळेच चक्रावले
Matrubhoomi: A Nation Without Women: महिलांचं हृदय पिळवटून टाकणारा सिनेमा, मुलीची फसवणूक, पाच मुलांसोबत लग्न, सासाऱ्यासोबत मधुचंद्र...., सिनेमा पाहून सगळेच चक्रावले

काही सिनेमे असे असतात जे पाहिल्यानंतर मन विचलित होतं आणि समाजात असं का होतं? असा प्रश्न पडतो… असाच एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आलेला, ज्यामुळे प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या. सिनेमाचा रिव्ह्यू वाचल्यानंतर देखील अनेकांना सिनेमाची कथा प्रचंड भयानक वाटली… सध्या ज्या सिनेमाची चर्चा सुरु आहे, त्या सिनेमाचं नाव ‘मातृभूमी ए नेशन विथआउट वुमन’ असं आहे. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाने महिलांचं हृदय पिळवटून टाकलं. सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन मनीष झा यांनी केलं होतं.
‘मातृभूमी’ सिनेमात सुशांत सिंह याच्यासोबत पियूष मिश्रा, सुधीर पांडे, आदित्य श्रीवास्तव, ट्यूलिप जोशी, पंकज झा यांनी मुख्य भूमिका बजावली होती. सिनेमाची कथा बिहार येथील आहे. सिनेमाची सुरुवात होते, एका लहान नवजात मुलीपासून… गावात जेव्हा मुलींचा जन्म होताच त्यांची हत्या केली जात होती. पण एक दिवस असा देखील आला जेव्हा गाावात लग्नासाठी एकही मुलगी नव्हती…
गावात फक्त पुरुष, मुलं आणि एक – दोन वृद्ध महिला होत्या. अशा परिस्थितीत मुलांचं लग्न करणं देखील मोठा चिंतेचा विषय झाला होता. सिनेमाची कथा वेगळं वळण घेते जेव्हा गावातील पुरुष स्वतःच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी वाईट मार्ग स्वीकारतात.
या चिडचिडीत अनेक घृणास्पद कृत्ये देखील गावातील पुरुष करतात. कुठेतरी कोणी पॉर्न पाहतं, तर कुठे क्रॉस जेंडर डान्सर्ससोबत आक्षेपार्ह कृत्ये करतात. इतकंच नाही तर ते प्राण्यांनाही त्यांच्या क्रूरतेचे बळी बनवतात. अशा प्रकारे हे गाव धक्कादायक बनते.
अशात, गावातील एका कुटुंबातील मुख्य व्यक्ती जो पाच मुलांचा बाप असतो, तो दुसऱ्या गावातून एक मुलगी खरेदी करुन आणतो. मोठ्या मुलाच्या लग्नासाठी मुलीला गावात आणतो आणि पाचही मुलांचं लग्न त्या एका मुलीसोबत लावून देतो… पाच मुलांसोबत लग्न करणाऱ्या मुलीचं नाव सिनेमात ‘कल्की’ असं आहे…
पाच पुरुषांसोबत लग्न झाल्यानंतर कल्कीची अवस्था प्रचंड वाईट होते, ज्याचा तिने कधी विचार देखील केला नसेल. प्रत्येक आठवड्यात तिला एक – एक भावासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतात. एवढंच नाही तर, परिस्थितीचा फायदा सासरा देखील घेतो… पण घरातील लहान मुलगा कल्की हिला समजून घेतो…
अशात घरातील लहान मुलगा आणि कल्की यांचं नातं घट्ट होतं. ज्यामुळे कुटुंबातील इतरांना दोघांचं नातं खटकतं आणि चार भाऊ मिळून घरातील लहान मुलाची हत्या करतात. त्यानंतर कल्की गरोदर राहते… ही बातमी ऐकून सर्वजण आनंदी होतात. संपूर्ण कुटुंब आपापसात भांडू लागतं, ते मूल आपलं आहे असा दावा करून दुसऱ्या व्यक्तीला मारण्यास तयार होतात आणि कल्की एका मुलीला जन्म देते…
सांगायचं झालं तर, सिनेमाच्या कथेचं सर्वत्र कौतुक झालं. अनेक युजर्सनी IMDb वर याबद्दल सिनेमाला चांगले रिव्ह्यू दिले. सिनेमात यूट्यूबवर उपलब्ध आहे…
