Mumbai RPF : आरपीएफ ठरतंय जीवरक्षक, मुंबईत वर्षभरात वाचवले 47 जणांचे प्राण

या वर्षी 2021 मध्ये, 11 प्रकरणे कल्याण स्थानकावर, 10 प्रकरणे दादर येथे, 6 ठाणे, 4 लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल येथे 3, कुर्ला आणि वडाळा रोड येथे प्रत्येकी 2 तसेच तुर्भे, टिटवाळा, रोहा, कसारा, डोंबिवली, घाटकोपर, भायखळा, दिवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेन लाइन स्थानकांवर प्रत्येकी 1 प्रकरणांत, अशा प्रकारे मुंबई उपनगरी/गैर उपनगरीय नेटवर्कवर, 47 जीव वाचविण्यात आले.

Mumbai RPF : आरपीएफ ठरतंय जीवरक्षक, मुंबईत वर्षभरात वाचवले 47 जणांचे प्राण
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: File
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 11, 2022 | 12:56 AM

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकलच्या मार्गावर मुंबई आरपीएफचे जवान खऱ्या अर्थाने ‘जीवरक्षक’ची भूमिका निभावू लागले आहेत. वास्तविक हे कर्मचारी नेहमीच विविध मोहिमांमध्ये आघाडीवर असतात. रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी ते 24 तास जागरुक राहतात. याबरोबरच त्यांनी इतर कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील शेकडो रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवले आहे. “मिशन जीवन रक्षक” चा एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या आरपीएफ कर्मचार्‍यांनी 2021 मध्ये मुंबई उपनगरीय प्रणालीवर काही वेळा स्वतःचा जीवही धोक्यात घालून आतापर्यंत 47 लोकांचे प्राण वाचवले आहेत. यापैकी काही जीव वाचवणाऱ्या घटनांचे व्हिज्युअल्स प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वर्ष 2021 मध्ये 47 जणांचे प्राण वाचवले

या वर्षी 2021 मध्ये, 11 प्रकरणे कल्याण स्थानकावर, 10 प्रकरणे दादर येथे, 6 ठाणे, 4 लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल येथे 3, कुर्ला आणि वडाळा रोड येथे प्रत्येकी 2 तसेच तुर्भे, टिटवाळा, रोहा, कसारा, डोंबिवली, घाटकोपर, भायखळा, दिवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेन लाइन स्थानकांवर प्रत्येकी 1 प्रकरणांत, अशा प्रकारे मुंबई उपनगरी/गैर उपनगरीय नेटवर्कवर, 47 जीव वाचविण्यात आले. रेल्वे संरक्षण दलाचे हे शूर जवान त्यांच्या सतर्कतेने आणि धैर्याने अनेक प्रवाशांचे प्राण वाचवून देवदूत बनले आहेत.

रेल्वे संरक्षण दलाला विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो

रेल्वे संरक्षण दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा आणण्याऱ्यांचा बंदोबस्त, बेपत्ता मुलांची सुटका करणे आणि रेल्वेगाड्या आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे अशा विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. या सगळ्यासह ते प्रवाशांच्या सुरक्षेवर बारीक लक्ष ठेवून असतात.

बहुतेक प्रकरणांमध्ये सतर्क आरपीएफने अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करताना जीव वाचवण्यात आला आहे. पण सरतेशेवटी, तारणकर्त्यांच्या या कृतीचा परिणाम आनंद आणि आरपीएफ जवानांप्रती शब्दांत व्यक्त न होणारी कृतज्ञता यात होतो. (RPF personnel save 47 lives in Mumbai in 2021)

इतर बातम्या

Maharashtra Corona update : आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, कुठे किती रुग्ण? वाचा सविस्तर

‘मावळा’ पहिली मोहीम फत्ते करणार, कोस्टल रोड कधीपर्यंत पूर्ण होणार? वाचा सविस्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें