Maharashtra Corona update : आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, कुठे किती रुग्ण? वाचा सविस्तर

राज्यात आज 33 हजार 470 नवे रुग्ण आढळून आलेत काल हा आकडा 44 हजारांच्या पुढे पोहोचला होता.

Maharashtra Corona update : आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, कुठे किती रुग्ण? वाचा सविस्तर
Corona patient

मुंबई : कोरोना रुग्णसंख्येत महाराष्टाला काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा घटला आहे. राज्यात आज 33 हजार 470 नवे रुग्ण आढळून आलेत काल हा आकडा 44 हजारांच्या पुढे पोहोचला होता. दिवसभरात 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर 29 हजार 671 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आजही मुंबईला मोठा दिलास

एकट्या मुंबईतला कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या पुढे पोहोचला होता, त्यामुळे मुंबईचेही धाबे दणाणले होते, मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील रुग्णसंख्येत घट होत असल्याचे आढळून आले आहे. काल ही घट कमी होती मात्र ही घट आणखी जास्त वाढली आहे. आज मुंबईत 13 हजार 648 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 हजारांच्या पुढे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर पुण्यातला कोरोना रुग्णांचा आकडाही काहीसा घटला आहे. काल पुण्याच चार हजारांच्या पुढे रुग्ण आढळून आले होते, तोच आकडा आज तीन हजारांवर आला आहे.


ओमिक्रॉनचा तिसरा दिलासा

राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णातही रोज मोठी वाढ होत होती, तोही आकडा आज घटल्याचे दिसून येत आहे. आज राज्यात 31 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय. त्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत, पुण्यात 28 रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात 1247 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली असून, 467 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

Guru chandala yog | तुमच्या कुंडलीत गुरु-चांडाळ दोष आहे ? घाबरून जावू नका हे सोपे उपाय करा

Punjab Assembly Election 2022 : मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? पहिल्या स्थानी चन्नी, सिद्धू कितव्या?

पंतप्रधान मोदींच्या सूरक्षेतील चूक प्रकरणाला नवं वळण मिळणार? ‘या’ संघटनेनं स्वीकारली जबाबदारी!

 

Published On - 9:10 pm, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI