सलमान खानच्या हत्येचा कट? सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी शार्प शूटरला नेपाळमधून अटक, पोलिसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

सिद्धेश सावंत

|

Updated on: Sep 12, 2022 | 7:50 AM

शुभदीप सिंग सिद्धू, उर्फ सिद्धू मुसेवाला याची मे 29 रोजी हत्या करण्यात आली होती. दिवसाढवळ्या पंजाबच्या मानसा जिल्ह्यात मुसेवालाला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. खुल्या जीपमधून जात असतेवेळी झालेल्या हल्ल्यात सिद्धू मुसेवाला ठार मारला गेला होता.

सलमान खानच्या हत्येचा कट? सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी शार्प शूटरला नेपाळमधून अटक, पोलिसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
सलमान खान आणि सिद्धू मुसेवाला
Image Credit source: TV9 Marathi

मुंबई : पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड (Sidhu Moose wala Murder Case) प्रकरणातील 6 वा शार्पशूटर अखेर पकडला गेला. शनिवारी नेपाळ (Nepal) सीमेवरुन दोघांना अटक करण्यात आली, अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे. दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना शार्प शूटरच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. दीपक मुंडी असं या शार्प शुटरचं नाव आहे. शार्पशुटर दीपक मुंडी हा बनावट पासपोर्टच्या मदतीने दुबईत पलायन करण्याच्या तयारीत होता. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. यासोबत पोलिसांनी दीपक मुंडी याच्या निशाण्यावर अभिनेता सलमान खानही (Salman Khan) होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले पोलीस?

पंजाब पोलीस अधिकारी गौरव यादव यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. शार्पशुटर दीपक मुंडी याने कपिल पंडीत याच्या साथीने सलमान खान बाबत रेकी केली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या मदतीने अभिनेता सलमान खान याची हत्या करण्याचा त्यांचा प्लान होता, असं पोलिसांनी म्हटलंय.

सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर तीन महिन्यांनी, सहाव्या शार्पशूटरला अटक करण्यात आली आहे. दीपक मुंडी हा आपल्या अन्य दोन साथीदारांसोबत दार्जीलिंग इथं होता. इंडो-नेपाळ सीमेवर खारीबरी पोलीस स्थानकाच्या हद्दीतून त्याला अटक करण्यात आली. दिल्ली पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी एकत्र मिळून सापळा रचत ही कारवाई केली.

हे सुद्धा वाचा

LIVE Video : पाहा ताज्या घडामोडी लाईव्ह

सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरण

शुभदीप सिंग सिद्धू, उर्फ सिद्धू मुसेवाला याची मे 29 रोजी हत्या करण्यात आली होती. दिवसाढवळ्या पंजाबच्या मानसा जिल्ह्यात मुसेवालाला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. खुल्या जीपमधून जात असतेवेळी झालेल्या हल्ल्यात सिद्धू मुसेवाला ठार मारला गेला होता. आता हत्याप्रकरणी दीपक मुंडी, कपील पंडीत, राजींदर जोकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकूण 23 जणांना आतापर्यंत या प्रकरणी अटक करण्यात झाली आहे.

सलमानच्या हत्येचा कट?

कपिल पंडीत याच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा झाला आहे. कपील पंडीतने लॉरेन्स बिश्नोईसह संपत नेहरा आणि गोल्डी ब्रार यांच्यासह मिळून सलमान खानला टार्गेट करायचं ठरवलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. सचिन बिश्नोई आणि संतोष यादव यांच्या साथीने मुंबईत सलामन खानची रेकी करण्यात आली होती, अशीही माहिती समोर आलीय.

तुझा सिद्धू मुसेवाला सारखा हाल करु, अशी धमकी देणारी एक चिट्ठी सलमान खानला देण्यात आली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सापडलेल्या या धमकीच्या पत्राने एकच खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली होती. या धमकीचे लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा संशयदेखील तेव्हा व्यक्त करण्यात आला होता.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI