‘आधी आईच्या मांडीवर डोकं ठेऊन टीव्ही पाहिला’, भंडाऱ्यात क्लास वन अधिकाऱ्याच्या आत्महत्येनं खळबळ

भंडाऱ्यात क्लास वन अधिकारी असलेल्या साताऱ्याच्या लेकीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:20 PM, 7 Mar 2021
'आधी आईच्या मांडीवर डोकं ठेऊन टीव्ही पाहिला', भंडाऱ्यात क्लास वन अधिकाऱ्याच्या आत्महत्येनं खळबळ

भंडारा : प्रत्येक तरुणाला आपण स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत रुजू व्हावं असं मनोमन वाटत असतं. मात्र, भंडाऱ्यात आपलं हे स्वप्न पूर्ण करणाऱ्या साताऱ्याच्या लेकीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. शीतल फाळके (32 वर्षे) असं या पीडित तरुणीचं नाव आहे. शीतल फाळके भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात तालुका महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) म्हणून काम करत होत्या (Satara Young class one officer Sheetal Phalke suicide in Bhandara).

शीतल फाळके लाखनी येथे आपल्या आईसोबत राहत होत्या. येथेच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शीतल फाळके मुळच्या सातारा येथील रहिवासी होत्या. त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर नोकरीनिमित्ताने भंडाऱ्यात आल्या. त्या अविवाहित होत्या.

विशेष म्हणजे आत्महत्येचं पाऊल उचलण्याआधी त्या सामान्यपणे आपल्या आईशी वागल्या. त्यांनी आईच्या मांडीवर डोकं ठेवत टीव्हीही पाहिला. त्यानंतर दोघीही झोपी गेल्या. मात्र, मध्यरात्री त्यांच्या आईला जाग आल्यानंतर त्या बाथरुममध्ये गेल्या असता त्यांना आपल्या मुलीने गळफास घेतल्याचं लक्षात आलं.

लाखनी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. सध्या पोलीस या प्रकरणी सर्व बाजूंची चौकशी करत असून पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा :

“मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करतात, कृषी कायदे मागे घ्या”, दिल्लीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

VIDEO | दंतवैद्यक शिक्षण घेणाऱ्या मुलाला सात विषयात शून्य गुण, नागपुरात काँग्रेस प्रदेश महासचिवाचा आत्महत्येचा प्रयत्न

Ayesha Khan Suicide | ‘दुआओं में याद रखना’, नवऱ्याला व्हिडीओ पाठवला, नदीत उडी घेत विवाहितेची आत्महत्या

व्हिडीओ पाहा :

Satara Young class one officer Sheetal Phalke suicide in Bhandara