pune crime | वाकडमध्ये धारदार शस्त्राने वार करून भंगारवेचकांची हत्या ; एकास अटक

pune crime | वाकडमध्ये धारदार शस्त्राने वार करून भंगारवेचकांची हत्या ; एकास अटक
crime News

आरोपी दत्ता लक्ष्मण पटेकर व मृत रवी वाकडमध्ये भंगारवेचकाचे करायचे. घटनेच्या वेळी दोघीही वाकड परिसरातील चौधरी पार्क येथे मध्यरात्रीच्या सुमारास दारू पित बसले होते.दारू पिता असतानाच दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यातून आरोपी दत्ताने रवी याच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याची हत्या केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Dec 12, 2021 | 10:38 AM

पिंपरी- शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने घडताना असतात. पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथे भंगारवेचकाचा धारधार शास्त्राने वार करून हत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आली आहे. वाकडमधीलचौधरी पार्क येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्ता पटेकर याला अटक केली आहे.

नेमक काय झालं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दत्ता लक्ष्मण पटेकर व मृत रवी वाकडमध्ये भंगारवेचकाचे करायचे. घटनेच्या वेळी दोघीही वाकड परिसरातील चौधरी पार्क येथे मध्यरात्रीच्या सुमारास दारू पित बसले होते.दारू पिता असतानाच दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यातून आरोपी दत्ताने रवी याच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याची हत्या केली.

‘आम्ही या परिसरातील भाई अशी धमकी दुकानदाराला मारहाण 

दुसरीकडं आम्ही या परिसरातील भाई आहोत, इथून आम्हाला हप्ता द्यायचा, अशी धमकी देत दुकानाच्या दरवाजावर लाकडी दांडक्याने मारत दुकानांची तोडफोड केली आहे . याचवेळी दुकानदाराला कोयता उलट्या बाजूने मारून जखमी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत समसाद रफिक शाह (वय २२,रा. उत्तर प्रदेश) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ओमकार गायकवाड, राम कांबळे, सैफाली रैन (तिघेही रा. दापोडी) आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

फिर्यादीचे सलूनचे दुकान फिर्यादीचे दापोडी येथे न्यू स्टेटस सलून नावाचे केस कापण्याचे दुकान आहे. आरोपी हे फिर्यादीच्या दुकानात आले. आरोपी ओंकार गायकवाड यांनी त्याच्या हातातील लोखंडी कोयता उलट्या बाजूने फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादीला दुखापत केली. मेरे बच्चे लोगो का फ्री मे बाल काटने का, नही तो तेरा दुकान तोड दुंगा, असे आरोपी म्हणाला. त्यानंतर आरोपींनी लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या दुकानातील काच फोडून दुकानाच्या गल्यातील एक हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. अशी पोलिसांनी दिली आहे.

Nashik| प्रसिद्ध शिल्पकार गर्गे यांच्या स्टुडिओवर दरोडा; 1400 किलो ब्राँझ धातूची लूट, सुरक्षारक्षक जखमी

Video | महाविकास आघाडीला फक्त वसुलीत रस; बहुजनांच्या मुलांकडे दुर्लक्ष, म्हाडाच्या परीक्षेवरून पडळकरांचा टोला

Nagpur ZP | आम्हाला गणवेश केव्हा मिळेल? विद्यार्थी विचारतात झेडपीला प्रश्न

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें