भयानक ! कुत्र्यावरून सुरू झालेल्या वादाला हिंसक वळण, गार्डने केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू
भांडण वाढल्यानतर आरोपी गार्ड हा अचानक घरातील बंदूक घेऊन वर गेला आणि त्याने गोळीबार केला. यामध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत.

इंदोर| 18 ऑगस्ट 2023 : एका विचित्र आणि दुःखद घटनेत, दोन कुत्र्यांमधील भांडण त्यांच्या मालकांच्या भांडणासाठी (dispute over dog) कारणीभूत ठरले. अन् त्याचा अतिशय हिंसक व दु:खद शेवट झाला. या संघर्षात दोघांचा मृत्यू झाला (2 died) असून सहा जण जखमी झाले आहेत. कुत्र्यांवरून सुरू झालेल्या वादानंतर एकाच्या मालकाने घराच्या छतावरून केलेल्या गोळीबारात निष्पापण लोकांना जीव गमवावा लागला तर काही जण गंभीर जखमी झाले. मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपाल असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो बँक ऑफ बडोदा येथे गार्ड म्हणून कार्यरत आहे. त्याने त्याच्या सर्व्हिस गनचा वापर करून गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी गार्डला अटक केली असून त्याच्याकडून गोळीबारासाठी वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.
नक्की काय घडलं ?
पोलिसांच्या सांगण्यानुसार, दोन शेजाऱ्यांनी त्यांच्या कुत्र्यांना बाहेर फिरायला नेल्यानंतर थोड्याच वेळात हा प्रकार घडला. प्रथम हे दोन्ही श्वान एकमेकांवर भुंकू लागले व त्यांच्यात भांडण झाले व नंतर मालकांणमध्ये वाद झाला. मात्र तेव्हा शेजारी-पाजारी असणाऱ्या इतर लोकांनी मध्यस्थी करत भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही थोड्यावेळाने वाद पुन्हा पेटला आणि एका कुत्र्याचा मालक असलेल्या राजपाल यांनी घरात जाऊन बंदूक घेतली आणि वरच्या मजल्यावर जाऊन गोळ्या झाडल्या.
कुत्ते को रखने और उसे घुमाने का विवाद अब बेहद हिंसक भी होने लगा है। इंदौर में बैंक के सिक्योरिटी गार्ड ने इसी विवाद में 8 लोगों को गोली मार दी। 2 व्यक्ति की मौत हो गयी है। 6 घायल है। pic.twitter.com/DglXAS7KsW
— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) August 18, 2023
आरोपी राजपाल यांनी प्रथम हवेत दोन गोल्या झाडल्या आणि नंतर त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. .12 बोरच्या डबल बॅरेल बंदूकीतून त्यांनी गोळीबार केला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी राजपाल आणि मृत नागरिक यांच्यात आधीपासून काही वाद नव्हता असे पोलिसांनी स्पष्ट केले. हा वाद अचानक सुरू झाला व नंतर त्याचे तीव्र संघर्षात रुपांतर झाले असे पोलिसांनी सांगितले.
