‘टॉक्सिक’च्या टीझरने उडवली खळबळ, यशचा भौकाली अवतार, पण मुलांसाठी धोक्याची घंटा
'केजीएफ 2' अभिनेता यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून यामधून त्याची पहिली झलक समोर आली आहे. ज्यामधील यशच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिकंली आहेत.

Toxic Teaser-Trailer : केजीएफ आणि केजीएफ 2 या चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता यश हा सध्या त्याच्या आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स (Toxic A Fairy Tale for Grown Ups)’ मुळे सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे. 8 जानेवारी रोजी यशचा वाढदिवस होता. याच दिवशी त्याच्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.
दरम्यान, हा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तो प्रचंड ट्रेंड होत असून तो चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्रीची देखील झलक समोर आली आहे. यामधील यशच्या कारमधील सीनने चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
टॉक्सिकचा टीझर कोणी बघावा?
अभिनेता यशने त्याच्या एक्स म्हणजेच पूर्वीचे ट्विटरवर त्याच्या टॉक्सिक चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो एकदम जबरदस्त अॅक्शन अवतारामध्ये दिसत आहे. त्याचा टीझरमधील अवतार पाहून चाहते देखील त्याच्या अभिनयाचे कौतुक करत आहे.
मात्र, सध्या या टीझरमधील एक बोल्ड सीन सध्या खूपच चर्चेत आला आहे. हा सीन पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. त्यामुळे काही जणांनी हा टीझर लहान मुलांना दाखवू नये असं देखील म्हटलं आहे. तर काहींनी टीझरमधील बोल्ड सीनवर संताप देखील व्यक्त केला आहे.
टॉक्सिकमध्ये कोण-कोण?
या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजीव रवी यांनी सिनेमॅटोग्राफी, संगीतमध्ये रवी बसरूर, संकलन उज्ज्वल कुलकर्णी आणि निर्मिती डिझाइन टीपी आबिद यांच्याकडे आहे. या उच्च दर्जाच्या अॅक्शन चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जोड़ी अंबरिव आणि केचा खाम्फाकडी यांनी केले आहे. तसेच जॉन विक म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध हॉलिवूड अॅक्शन दिग्दर्शक जेजे पेरी यांनी केले आहे.
किती आहे यशची नेटवर्थ?
‘केजीएफ: चॅप्टर 1’मधील ‘रॉकी’ या भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील त्याचा अभिनय पाहून चाहते देखील वेडे झाले. CAknowledge.com च्या रिपोर्टनुसार यशची नेटवर्थ ही 50 ते 60 कोटींच्या आसपास असल्याचे म्हटले जाते. त्याची वर्षभराची कमाई ही सुमारे 8 ते 10 कोटी रुपयांमध्ये आहे.
