AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कथित ड्रग्ज प्रकरण, आरोपींच्या आवाजाचे नमुने तपासण्यास न्यायालयाची परवानगी

आरोपींना तपास अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार एनसीबीसमोर हजर राहून त्यांच्या आवाजाचे नमुने देण्याचे निर्देश दिले आहेत. एनसीबीने 2020-2021 या कालावधीत अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह 30 हून अधिक लोकांना अटक केली होती.

कथित ड्रग्ज प्रकरण, आरोपींच्या आवाजाचे नमुने तपासण्यास न्यायालयाची परवानगी
ड्रग प्रकरणातील आरोपींच्या आवाजाच्या टेस्टला न्यायालयाची परवानगीImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 17, 2023 | 5:50 PM
Share

मुंबई / ब्रिजभान जैस्वार (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर दाखल करण्यात आलेल्या कथित ड्रग्ज प्रकरणासंदर्भात 8 आरोपींच्या आवाजाच्या नमुन्यांची तपासणी करण्यास न्यायालयाने एनसीबीला परवानगी दिली आहे. दोन वर्षांनी मुंबईतील विशेष न्यायालयाने या याचिकेला परवानगी दिली आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर या प्रकरणात 2020-21 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एनसीबीने 2021 मध्ये आठ आरोपींच्या आवाजाचे नमुने मागवले होते. तपासासंदर्भात काही कॉल्सच्या तपासासाठी त्यांचे आवाज रेकॉर्ड करायचे आहेत. एनसीबीने दावा केला होता की, तपासकर्त्यांनी या आरोपींमधील व्हॉईस चॅट्स जप्त केल्या आहेत. त्यांच्या आवाजाचे नमुने घेणे आवश्यक आहे.

आोरपींमध्ये धर्मिक एंटरटेनमेंटचे माजी कार्यकारी निर्माते क्षितिज प्रसाद, दिग्दर्शक करण जोहरची बहिण चिंता अनुज केशवानी, संकेत पटेल, जिनेंद्र जैन, अब्बास लखानी, जैद विलात्रा, ख्रिस परेरा आणि करमजीत सिंग यांचा समावेश आहे.

आरोपींच्या वकिलांनी याचिकेला केला होता विरोध

काही आरोपींच्या वकिलांनी याचिकांना विरोध केला होता. केशवानी याच्या वतीने वकिलांनी 2021 मध्ये उल्लेख केलेल्या आरोपींमध्ये कोणताही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये कट असल्याचे दर्शविल्या जाणार्‍या कोणत्याही संभाषणाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हटले होते.

असा दावाही करण्यात आला की, ड्रग प्रकरणाचा निर्णय एनसीबीने अंमली पदार्थ आणि एनडीपीएस कायद्याच्या कलम 67 अंतर्गत नोंदवलेल्या विधानांवर विसंबून आहे.

एनसीबीने रिया चक्रवर्तीसह 30 लोकांना केली होती अटक

आरोपींना तपास अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार एनसीबीसमोर हजर राहून त्यांच्या आवाजाचे नमुने देण्याचे निर्देश दिले आहेत. एनसीबीने 2020-2021 या कालावधीत अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह 30 हून अधिक लोकांना अटक केली होती.

गेल्या वर्षी एजन्सीने आरोपींविरुद्ध आरोपांचा मसुदा सादर केला होता. याउलट काही आरोपींनी आरोपमुक्तीसाठी कोणताही पुरावा नसल्याचा दावा करत डिस्चार्ज अर्जांसह न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने अद्याप याचिकांवर सुनावणी सुरू केलेली नाही. या प्रकरणाची सुनावणी अजून सुरू व्हायची आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.