AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhusawal : चंद्रकांत बढे यांच्यासह सात संचालकांना अटक, बुलडाणा सीआयडी पथकाची कारवाई

बुलडाणा येथील ठेवीदाराने बढे पतसंस्थेत दोन लाख २० हजार रुपयांची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली होती. या रकमेची मुदत 19 ऑक्टोबर 2013 रोजी संपली होती. त्यानंतरही ही रक्कम न मिळाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Bhusawal : चंद्रकांत बढे यांच्यासह सात संचालकांना अटक, बुलडाणा सीआयडी पथकाची कारवाई
चंद्रकांत बढे यांच्यासह सात संचालकांना अटकImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 16, 2022 | 10:24 AM
Share

भुसावळभुसावळ (bhusawal)  तालुक्यातील वरणगाव (warangaon) येथील चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेत ठेवलेली मुदत ठेवीची रक्कम वेळेवर परत न दिल्याने चेअरमन चंद्रकांत बढे (chandrakant badhe) यांच्यासह सात संचालकांना बुलडाणा सीआयडी पथकाने अटक केली आहे. चंद्रकांत हरी बढे, राजेंद्र विश्वनाथ चौधरी, भागवत मुरलीधर पाटील, बळिराम केशव माळी, गोविंद ज्ञानेश्वर मांडवगणे, भिकू शंकर वंजारी, विजय गणपत वाघ या सात संचालकांचा सीआयडी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांची खोलवर तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच आत्तापर्यंत पतसंस्थेविरोधात किती लोकांनी तक्रारी केल्या आहेत याची सुध्दा चौकशी होणार आहे. अनेक लोकांनी तक्रारी केल्या असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. विशेष म्हणजे अनेक ठेवीदारांना वेळेत रक्कम मिळत नाही.

सात संचालकांना अटक केली

बुलडाणा येथील ठेवीदाराने बढे पतसंस्थेत दोन लाख २० हजार रुपयांची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली होती. या रकमेची मुदत 19 ऑक्टोबर 2013 रोजी संपली होती. त्यानंतरही ही रक्कम न मिळाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पथकाने वरणगाव शहरात येऊन या पतसंस्थेच्या सात संचालकांना अटक केली.या पथकामध्ये उपविभागीय अधिकारी अनिल पवार, उपविभागीय अधिकारी यांचा समावेश आहे. संचालकांना ताब्यात घेतल्यापासून त्यांची आणि पतसंस्थांची कसून चौकशी सुरू आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.