AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिल्ल तरुणांचा चौकशी करताना लैंगिक छळ, पोलीस उपनिरीक्षक निलंबित

जळगावच्या चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलवून तीन तरुणांना पोलीस उपनिरीक्षकाने पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करत त्यांचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भिल्ल तरुणांचा चौकशी करताना लैंगिक छळ, पोलीस उपनिरीक्षक निलंबित
jalgoan chopda police station
| Updated on: Jul 28, 2025 | 8:30 PM
Share

एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणावरुन तक्रारदारांच्या आरोपावरुन संयशित म्हणून पकडलेल्या भिल्ल समाजाच्या मुलांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करुन त्यांना परस्परांशी लैंगिक चाळे करायला लावण्याचा प्रकार जळगाव येथील चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात घडला आहे. या प्रकरणात बहुजन समाज पार्टीने या प्रकरणात तक्रार केली आहे.दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

एका गुन्ह्याप्रकरणात संशयावरुन ताब्यात घेतलेल्या भिल्ल समाजाच्या मुलांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करणाऱ्या आणि परस्परांशी लैंगिक चाळे करण्यास भाग पाडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भिल्ल समाजाच्या तीन तरुणांना अंगावरचे कपडे काढून नग्न व्हायला सांगून एकमेकांसोबत लैंगिक चाळे करायला भाग पाडल्याचा घाणेरडा प्रकार पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यात केल्याचे म्हटले जात आहे. एका महिलेला सुद्धा अश्लील शिवीगाळ करून तिला मारहाण केल्याची तक्रार महिलेने केली आहे.

या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव सज्जनसिंह नार्हेडा असून या घटनेनंतर त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या गंभीर घटनेनंतर संबंधित पीडित तरुणांच्या कुटुंबियांनी तसेच एकलव्य संघटनेने तक्रार केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करुन त्याची चौकशी करण्यात येत आहे. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून या तिघा तरुणांना पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानंतर तिन्ही तरुणांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करत एकमेकांसोबत लैंगिक चाळे करायला भाग पाडल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे.

विभागीय चौकशी सुरू

संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित तरुणांच्या कुटुंबीयांसह भिल्ल समाज संघटनेने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याचे बहुजन समाज पार्टी, जळगाव जिल्हा महासंघाचे पदाधिकारी सचिन बाविस्कर यांनी म्हटले आहे. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात येऊन त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत दोषी निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.