शौकत तू मला एकटीला सोडून का निघून गेलास? प्लीज उठना, तिची आर्त हाक ऐकून सगळेच गहिवरले, पण शौकत मागे सोडून गेलाय अनेक रहस्य
भाऊ जुम्मा खानने सांगितलं की, "मी आणि शौकत फर्निचरचं काम करायचो. काही दिवसांपासून शौकत इथे आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन आलेला. त्याची गर्लफ्रेंड झारखंडची आहे. ती आमच्यासोबत राहत होती. सर्वकाही व्यवस्थित होतं"

21 सप्टेंबरची तारीख. सकाळी 10 ची वेळ. शिव ठाणे क्षेत्रातील उण्डू गाव.येथील एका खोलीतून जोरात मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. तिचं ओरडणं ऐकून आसपासचे लोक तिथे पोहोचले. त्यांनी पाहिलं की, जमिनीवर एका युवकाचा मृतदेह पडलेला. त्याच्या मृतदेहाला कवटाळून एक मुलगी हमसून-हमसून रडत होती. ती म्हणत होती की, शौकत तू हे काय केलंस?. मला एकट्याला सोडून निघून गेलास? मी तुझ्याशिवाय कशी राहू? प्लीज उठना. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील हे प्रकरण आहे.
ते दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेला प्रत्येकजण भावूक झाला. मृत्यू झालेल्या युवकाच नाव शौकत खान होतं. तो 22 वर्षांचा होता. मुलगी त्याच्या मृतदेहाल कवटाळून रडत होती. ती त्याची गर्लफ्रेंड होती. तिचं वय 19 वर्ष आहे.
मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमार्टमसाठी पाठवला
त्याचवेळी मृत शौकतचा भाऊ जुम्मा खान तिथे आला. तो सुद्धा मृतदेह पाहून रडू लागला. लगेच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी शौकतचा मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमार्टमसाठी पाठवला.
दरवाजा आतून बंद होता
त्यानंतर चौकशीचा सिलसिला सुरु झाला. प्रेयसीने सांगितलं की, “मी किचनमध्ये जेवण बनवत होती. शौकतला बोलवायला आली, त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. मी खिडकीतून आत पाहिलं, तर शौकतने फास घेतलेला. मी शौकतच्या भावाला फोन केला. त्याला सगळं सांगितलं. मला माहित नाही की, शौकतने इतकं टोकाच पाऊल का उचललं?”
ती आमच्यासोबत राहत होती
भाऊ जुम्मा खानने सांगितलं की, “मी आणि शौकत फर्निचरचं काम करायचो. काही दिवसांपासून शौकत इथे आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन आलेला. त्याची गर्लफ्रेंड झारखंडची आहे. ती आमच्यासोबत राहत होती. सर्वकाही व्यवस्थित होतं. शौकतला काही अडचण असेल, तर तो मला सांगायचा. मला शौकतच्या गर्लफ्रेंडने फोन करुन सगळी माहिती दिली”
असं अचानक जीवन का संपवून घेतलं?
आसपासचे लोक बोलत होते की, जवळपास 10 दिवसांपूर्वी युवतीला नेण्यासाठी तिचे नातेवाईक आलेले. पण तिने मला शौकत सोबतच रहायचय सांगितलं आणि जाण्यास नकार दिला. त्यानंतर मुलीचे नातेवाईक निघून गेले. पोलिसांनी सांगितलं की, सांगड ओला गावात रहाणारा शौकत खान प्रेयसी आणि मोठा भाऊ जुम्मा खानसोबत उण्डू गावात भाड्याच्या घरात राहत होता. आम्ही केसचा तपास करत आहोत. असं अचानक जीवन का संपवून घेतलं? त्या मागच्या कारणांचा शोध घेत आहोत.
