बिल न भरल्यानं रुग्णाला एक महिना अडवून ठेवल्याचा आरोप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली सुटका

महेंद्र गायकवाड असं या सुटका केलेल्या रुग्णाचं नावं आहे. अपघातात जखमी झालेला रुग्ण हा पैठणमधील असून मागील दोन महिन्यापासून उपचारासाठी होता दाखल, त्यानंतरच  हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बिल न भरल्यानं रुग्णाला एक महिना अडवून ठेवल्याचा आरोप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली सुटका
बिल न भरल्यानं रुग्णाला एक महिना अडवून ठेवल्याचा आरोप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली सुटकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 11:33 PM

सोलापूर : रुग्णालयाचं बिलं भरलं (Hospital Bill) नाही म्हणून रुग्णालयाकडून अडवणूक होताना आपण अनेकदा पाहिलं आहे. असाच एक प्रकार पुन्हा सोलापुरात (Adhar Hospital Solapur) घडला आहे. सोलापूरमध्ये रुग्णालयाने उपचाराचे बील न भरल्याने अडवून ठेवलेल्या रुग्णाची शिवसेना (Shivsena) वैद्यकीय कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुटका केलीय. अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला उपचारानंतर एक महिना 6 दिवस अडकून ठेवल्याचा आरोप रुग्णाने केला होता, त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने पाऊलं उचलत या रुग्णाची सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. महेंद्र गायकवाड असं या सुटका केलेल्या रुग्णाचं नावं आहे. अपघातात जखमी झालेला रुग्ण हा पैठणमधील असून मागील दोन महिन्यापासून उपचारासाठी होता दाखल, त्यानंतरच  हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडेही प्रकरणाची तक्रार

सोलापुरातील आधार हॉस्पिटलने महिनाभरापासून डांबून ठेवल्याचा रुग्णाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याची दखल घेत शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या मनीष काळजे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णाची सुटका केल्याचे सांगितले आहे. रुग्णाची सुटका केल्यानंतर रुग्णाने त्यांचे मनापासून आभारही मानले आहेत. डिस्चार्जनंतर रुग्णाला थांबवणे कायद्याने गुन्हा असून याविरोधात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवल्याची मनीष काळजे यांनी माहिती दिलीय.

बिल भरण्यासाठी कुणीही आलं नाही-रुग्णालय

तर रुग्णाने उपचाराचे पैसे न भरल्याने रुग्णाला डिस्चार्ज दिला नसल्याची रुग्णालय प्रशासनानं कबुली दिलीय. रुग्णाच्या नातावईकांकडून आणि कंपनीच्या लोकांकडून वारंवार बिल भरतो असं सांगण्यात आलं, मात्र बिल भरण्यासाठी कुणीही आलं नाही, तसेच पेशंटजवळही कोणीच नव्हतं असेही रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

शिवसेनेचे पदाधिकारी काय म्हणाले?

वास्तविक पद्धतीने साडेतीन ते चार लाख रुपये दवाखान्यात आणि मेडिकलचे बिल भरलेलं आहे. स्वतःची परिस्थिती बिकट असताना देखील त्यांनी पैसे भरले,  मात्र आणखी पैसे भरल्याशिवाय सोडणार नाही, असं डॉक्टरांनी त्या रुग्णाला सांगितलं. उर्वरित पैसे भरण्यासाठी मला काही सवलत द्या, काही मदत द्या, आम्हाला डिस्चार्ज करा, मी आज एक महिना झालं पैठण गावापासून लांब आहे, सोलापूर पुणे रोड वरती अपघात झाल्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी आहे, अशी त्यांनी विनंती केली. मात्र दवाखाना प्रशासनाला त्यांची कीव वाटली नाही, यामुळे त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होती, त्याची माहिती मिळताच आम्ही याठिकाणी पोहचून या रुग्णाची सुटका केलीय. अशी माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.