Nagpur NCP : राष्ट्रवादीच्या कामठी शहराध्यक्षाविरोधात तहसील पोलिसांत तक्रार, राजकीय द्वेषातून तक्रार केल्याची शोयब असद यांची प्रतिक्रिया

शोयब असद यांच्यावर जमिनीची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील तक्रार तहसील पोलिसांत दाखल आहे. ही जमीन स्वामी घाटे कुटुंबीयांकडून खरेदी केली होती.

Nagpur NCP : राष्ट्रवादीच्या कामठी शहराध्यक्षाविरोधात तहसील पोलिसांत तक्रार, राजकीय द्वेषातून तक्रार केल्याची शोयब असद यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसोबत कामठी शहराध्यक्ष शोयब असद
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 10:15 PM

नागपूर : राष्ट्रवादीचे कामठी शहराध्यक्ष शोयब असद यांच्यावर जमीन व्यवहार प्रकरणात (Land transaction case) पोलीस तक्रार करण्यात आली. तहसील पोलीस स्टेशन येथे दाखल तक्रारीची निष्पक्ष चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे कामठी शहराध्यक्ष शोयब असद ( Kamthi City President Shoaib Asad) यांनी केली. राजकीय भावनेनं आरोप केल्याची शोयब असद यांची प्रतिक्रिया आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन जमीन खरेदी केल्याचं असद यांचं म्हणणंय. राज्यात सत्ता बदल होताच राजकीय द्वेषातून तक्रार केल्याचा आरोप त्यांनी केलाय. नदीम इकबाल (Nadeem Iqbal) यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. एक प्लाट नदीम यांना विकला होता. नदीम यांनी पूर्ण रक्कम न दिल्यानं सौदा तुटला. त्यानंतर असदने चार लाख रुपये परत केले. काही पैसे देणे बाकी असल्यानं नदीम यांनी असद विरोधात तक्रार दिली होती.

शोयब असद यांचे म्हणणे काय

माझ्यावर काही आरोप लागले आहेत. हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. काही आमदारांच्या दबावापोटी तहसील पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. प्रापर्टीसंबंधात माझ्या नावाने रजिस्ट्री आहे. शेतमालकाला पैसे दिले आहेत. त्यासंदर्भातील बँक स्टेटमेंट तहसील पोलिसांत जमा केले आहेत. त्यानंतरही माझ्यावर आरोप लावण्यात आले. याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कामठीचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शोयब असद यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण

शोयब असद यांच्यावर जमिनीची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील तक्रार तहसील पोलिसांत दाखल आहे. ही जमीन स्वामी घाटे कुटुंबीयांकडून खरेदी केली होती. या शेतजमिनीची पूर्ण रक्कम दिली असल्याचं असद यांचं म्हणण आहे. असद यांनी प्लाट पाडून विक्री करण्यात आले. प्लाटचे पूर्ण पैसे न दिल्यानं तक्रारदाराचा सौदा रद्द झाला. असद यांनी यापैकी काही पैसे तक्रारदारास परत केले होते. काही रक्कम देणं बाकी होतं. अशात तक्रारकर्त्यानं तहसील पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी तपास सुरू आहे. आमदाराच्या दबावाखाली कारवाई सुरू असल्याचा आरोप असद यांनी केलाय.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.