दिल्ली प्रेयसी हत्या प्रकरण, मयत तरुणी श्रद्धा वालकर पालघरमधील वसईतील रहिवासी

माणिकपूर पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना मुलीचे मोबाईल लोकेशन, बँक खाते, फेसबुक, वॉट्स अप सर्व तपासले असता मे पासून बंद असल्याचे दिसले.

दिल्ली प्रेयसी हत्या प्रकरण, मयत तरुणी श्रद्धा वालकर पालघरमधील वसईतील रहिवासी
आफताबचे कपडे दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यातImage Credit source: social
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 6:44 PM

वसई : दिल्लीत झालेल्या तरुणीच्या हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात फेकले. लग्नाचा तगादा लावत असल्याने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. हत्या झालेली श्रद्धा वालकर ही मूळची मुंबई जवळच्या वसईतील राहणारी आहे. मयत श्रद्धा आणि तिचा बॉयफ्रेंड आफताब मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते. तेथेच त्यांची मैत्री झाली आणि मग मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. यानंतर दोघेही दिल्लीत शिफ्ट झाले आणि लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते.

श्रद्धा ही वसईतील रहिवासी

श्रद्धा वालकर ही तरुणी वसईतील संस्कृती अपार्टमेंट या इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर राहत होती. श्रद्धाचे कुटुंबीय हे वसईतील मूळ रहिवाशी आहे. श्रद्धाचे बालपण याच संस्कृती अपार्टमेंटमधील पाचव्या मजल्यावरील घरात गेले आहे. तिच्या घरात वडील आणि भाऊ राहतात.

वसई गावातील जिजी कॉलेजच्या बाजूला संस्कृती अपॉईंटमेंट आहे. या अपॉईंटमेंटमध्ये श्रद्धा वालकर आपल्या कुटुंबासोबत राहत असताना 2019 मध्ये मालाड येथील एका कॉल सेंटरमध्ये काम करीत होती. याचवेळी वसई दिवणमान येथील आफताब पुनावाला या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले होते.

हे सुद्धा वाचा

घरच्यांचा प्रेमसंबंधाला विरोध होता

हे प्रेमसंबंध जुळल्याचे तिने आपल्या घरी सांगितल्यावर घरच्यांनी तिला विरोध केला होता. पण घरच्यांचा विरोध झिडकारुन श्रद्धा ही तिचा प्रियकर आफताब पुनावाला यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये वसईतील नायगाव परिसरात रहायला गेली होती.

प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती तरुणी

हे प्रेमसंबंध तिचे घरच्यांना मान्य नसल्याने घरच्यांना सोडून वसई बाजूच्या नायगाव पूर्वेला श्रद्धा आणि तिचा प्रियकर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्यासाठी गेले होते.

त्यानंतर मे 2022 च्या सुमारास दिल्लीला प्रियकरासोबत रहायला गेली होती आणि तिचे हत्याकांड झाल्याचे उघड झाले आहे. श्रद्धा वालकर या मुलीचा फोन मे पासून बंद येत असल्याचे तिचा बालपणीचा मित्र लक्ष्मण नाडर याने तिच्या वडिलांना सांगितल्यावर 6 ऑक्टोबर 2022 ला तिच्या वडिलांनी वसईला मिसिंग दाखल केली होती.

जानेवारी 2020 मध्ये कोरोनाला काळात आई मयत झाल्यानंतर श्रद्धा 15 दिवसासाठी वडिलांकडे रहायला आली होती. पुन्हा ती आपल्या प्रियकराकडे राहण्यासाठी गेली होती. मार्च 2022 मध्ये ती आपल्या प्रियेकरासोबत उत्तर भारतात फिरायला जाते म्हणून वसई नायगाव येथून निघून गेले होते.

मित्राला प्रियकर त्रास देत असल्याचे सांगितले

श्रद्धा वालकर हिचा बालपणीचा मित्र लक्ष्मण नाडर हा तिच्याशी नेहमी संपर्कात होता. पण 2022 पासून तिचा फोन बंद येत असल्याने त्याने तिच्या वडिलांना याची माहिती दिली की, श्रद्धाचा फोन हा बंद येतोय.

श्रद्धा आणि लक्ष्मण हे बालपणीचे मित्र असल्याने श्रद्धा ही लक्ष्मणला तिचा प्रियकर मारतोय, त्रास देतोय हे नेहमी सांगायची. मे पासून तिचा फोन बंद येत असल्याने 5 महिन्यानंतर लक्ष्मणने तिच्या वडिलांना याची माहिती दिली होती.

मुलीचा फोन बंद असल्याचे कळताच वडिलांनी पोलिसात तक्रार दिली

6 ऑक्टोबर 2022 ला मुलीच्या वडिलांनी मिसिंगची तक्रार वसईला दाखल केली होती. ती तक्रार माणिकपूर पोलिसांना देण्यात आली, माणिकपूर पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना मुलीचे मोबाईल लोकेशन, बँक खाते, फेसबुक, वॉट्स अप सर्व तपासले असता मे पासून बंद असल्याचे दिसले.

माणिकपूर आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त तपास करत केला हत्येचा उलगडा

मुलाचे लोकेशन काढून त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडावीची पोलिसांना उत्तर दिले. पण अधिक तपासात ही मुलगी दिल्ली येथून मिसिंग झाली असल्याचे लक्षात आले. माणिकपूर पोलिसांनी दिल्ली येथे येऊन माणिकपूर आणि दिल्ली पोलिसांनी याचा समांतर तपास करून या हत्याकांडाचा उलघडा केला.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.