AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहा वर्षांपासून मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना श्रीगोंदा पोलिसांच्या बेड्या

श्रीगोंदा पोलिसांनी गेल्या सहा वर्षांपासून मोका गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्यात. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शेडगाव जवळा येथे कोंबिंग ऑपरेशन करत असताना आरोपींना अटक केली.

सहा वर्षांपासून मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना श्रीगोंदा पोलिसांच्या बेड्या
श्रीगोंदा पोलिसांनी गेल्या सहा वर्षांपासून मोका गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्यात...
| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 10:20 AM
Share

श्रीगोंदा (अहमदनगर) श्रीगोंदा पोलिसांना (Shrihonda Police) गेल्या सहा वर्षांपासून मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना पकडण्यात यश आलंय. संतोष ऊर्फ वंट्या दिलीप काळे आणि राहुल भारत चव्हाण, या दरोडेखोरांना पोलिस निरीक्षक रामराव ढिकले (Ramrao Dhikale) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शेडगाव जवळा येथे कोंबिंग ऑपरेशन करत असताना अटक केली. (Shrigonda police arrested the accused who have been absconding in the Moka crime for the last six years)

संतोष काळे आणि राहुल चव्हाण हे दोघेही अट्टल दरोडेखोर होते. त्यांनी अनेक चोऱ्या केल्या असून त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला होता. मात्र गेल्या सहा वर्षांपासून ते फरार होते. अखेर श्रीगोंदा पोलिसांनी त्यांना अटक केलीये.

दोन्ही गुन्हेगार दरोडेखोर, अनेक गुन्हे नावावर

शेडगाव येथे 25 तारखेला रंजना मारुती भदे (रा. शेडगाव) या महिलेच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून काही हजारांचा ऐवज त्यांनी लंपास केला होता. या प्रकरणातील आरोपी संतोष काळे हा जवळा येथील असला तरी गणेशवाडी येथे राहून तो दरोडे, चोऱ्या करीत होता. संतोषवर लोणी काळभोर, उरुळी कांचन, श्रीगोंदे, जामखेड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. पण तो 6 वर्षांपासून फरारी होता.

राहुल भारत चव्हाण याच्याविरोधात बारामती तसंच श्रीगोंदा पोलिसांत अनेक गुन्हे दाखल आहेत. श्रीगोंदा पोलिस कोंबिंग ऑपरेशन करत असताना दोघा अट्टल गुन्हेगारांना अटक केलीय. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, हेड कॉस्टेबल अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, गोकुळ इंगवले, किरण बोराडे, दादा टाके, अमोल कोतकर यांनी ही कारवाई केली.

काय आहे मोक्का?

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा यालाच मोक्का असं म्हणतात. मोक्का हे कायद्याचं नाव आहे. भारतीय दंड विधान संहितेच्या कलमाखाली गुन्हेगार, टोळ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण असल्याचे संबंधित तपास अधिकाऱ्याला वाटल्याने गुन्हेगारांच्या शेवटच्या गुन्ह्याचा दाखला देऊन अधिकारी ‘मोक्का’नुसार कारवाई नोंदवतात.

(Shrigonda police arrested the accused who have been absconding in the Moka crime for the last six years)

हे ही वाचा :

सहा महिन्यांपूर्वी लग्न, नवदाम्पत्यास चोरट्यांची बेदम मारहाण, पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज, औरंगाबाद हादरलं!

14 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी, लॉजवर नेऊन 5 तरुणांचा बलात्कार

खबऱ्याने माहिती दिली, कर्जत पोलिसांनी ट्रॅप लावला, दूध भेसळीची लाखो रुपयांची पावडर जप्त!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.