AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या अपघातातून वाचले, लगेच दुसरा अपघात, सहाही जणांचा मृत्यू, काळजाचा थरकाप उडाला; बीड हादरलं

बीड जिल्ह्यातील गेवराईजवळील गढी पुलावर झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. प्रथम एसयूव्हीचा किरकोळ अपघात झाला, पण गाडीतून बाहेर पडल्यानंतर ट्रकने धडक दिली.मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ट्रक चालक फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

पहिल्या अपघातातून वाचले, लगेच दुसरा अपघात, सहाही जणांचा मृत्यू, काळजाचा थरकाप उडाला; बीड हादरलं
बीड हादरलं, अपघातात 6 जण ठारImage Credit source: social media
| Updated on: May 27, 2025 | 10:44 AM
Share

बीड जिल्ह्यातून एक अत्यंत हादरवणारी बातमी समोर आली आहे. तेथे एका भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या गाडीचा पहिल्यांदा अपघात झाला, त्यातून ते बचावले आणि लगेच गाडीतून खाली उतरले. मात्र काळाचा घाला त्यांच्यावर बसलाच कारण जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या त्यांना ट्रकच्या रुपाने आलेल्या यमदूताने गाठलेच आणि सहा जणांचा जीव गेला. गेवराई शहरानजीकच्या गढी पुलावर झालेला हाँ अपघाता एवढा भीषण होता, की 6 लोकं जागीच ठार झाले. या घटनेमुळे अख्खं बीड हादरलं असून मृतांच्या कुटुंबावर तर दु:खाचा अक्षरश: डोंगरच कोसळला आहे.

पहिल्या अपघातातून वाचले, पण..

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला. गेवराई शहराच्या जवळ असलेल्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहन डिव्हायडरवर धडकल्याने किरकोल अपघात झाला होता. त्यात कोणालाही दुखापत झाली नाही, कोणी जखमी झालं नाही. मात्र ती एसयूव्ही डिव्हायडरला धडकून तिथेच अडकल्याने ती बाहेर काढण्यासाठी गाडीत बसलेले सर्व बाहेर आले. मात्र ते रस्यावर उतरून उभे असताना त्याच महामार्गावरून जाणारा एकक ट्रक भरधाव वेगाने आला आणि त्याने उभ्या असलेल्या लोकांना जोरदार धडक दिल्याने ते खाली कोसळले आणि चिरडले गेले.

हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकखाली चिरडल्या गेलेल्या सर्वांचाच मृत्यू झाला. बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे अशी मृतांची नावं आहेत. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णलयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तत्काळ धाव घेत पंचनामा केला तसेच जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. फरार ट्रकचालकाचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण बीड हादरलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.