तथाकथित सामाजिक कार्यकर्ता अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणी वाढल्या, पत्नी रुपालीचे खळबळजनक आरोप

सामाजिक कार्यकर्ता अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणी वाढवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अक्षयची पत्नी रुपाली बोऱ्हाडे यांनी पती अक्षय याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

तथाकथित सामाजिक कार्यकर्ता अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणी वाढल्या, पत्नी रुपालीचे खळबळजनक आरोप
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 7:55 PM

जयवंत शिरतर, टीव्ही 9 मराठी, जुन्नर : जुन्नरचे माजी नगरसेवक आणि शहा एचपी गॅस वितरक रुपेश शहा यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता आणि शिवऋण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणी वाढवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अक्षयची पत्नी रुपाली बोऱ्हाडे यांनी पती अक्षय याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अक्षयच्या पत्नीचे नेमके आरोप काय?

अक्षय, त्याची आई सविता बोऱ्हाडे, दीर अनिकेत बोऱ्हाडे यांनी आपला प्रचंड छळ केल्याचा आरोप रुपाली बोऱ्हाडे यांनी केला आहे. सासरच्यांनी हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच वेळोवेळी रिव्हॉल्वर आणि गुंडांचा धाक दाखवून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. कोणतेही काम न करता शिवऋण संस्थेतून आलेल्या निधीचा वापर स्वत:च्या चैनीसाठी केला. तसेच वेगवेगळ्या मुलींसोबत अनैकतिक संबंध ठेवत फसवणूक केली, असा आरोप त्यांनी केला आहे.

जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रुपाली बोऱ्हाडे यांनी पती अक्षय आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन कलम 498 (अ) , 420,406,324,323,504,506, 34 शस्त्र आधिनियम 25 (अ) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

अक्षयसोबत सोशल मीडियावर मैत्री

रुपाली यांनी जुन्नरच्या एका स्थानिक पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अक्षयसोबत आपली पहिली भेट कधी झाली तेव्हापासून ते आतापर्यंतच्या सविस्तर घडामोडी सांगितल्या आहेत. रुपाली यांची अक्षयसोबत चर्चा वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली होती. त्यावेळी रुपाली या कल्याणमध्ये एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होत्या. अक्षय यानेच आपल्याला लग्नाची मागणी घातलेली, असंही रुपाली यांनी या मुलाखतीत सांगितलं.

अक्षय बोऱ्हाडे रस्त्यावरील किंवा फुटपाथवरील अपंगाची सेवा करतो, असं आपल्याला सोशल मीडियाद्वारे विविध व्हिडीओंमधून समजलं. कल्याण रेल्वे स्थानकावर एक अपंग महिला आपण बघितली. त्याबाबत आपण फेसबुकद्वारे अक्षयसोबत संपर्क करुन माहिती दिली. त्यावेळी अक्षयने कल्याणला जेव्हा येऊ तेव्हा त्यांना घेऊन जाऊ, असं सांगितलं. याच मुद्द्यावरुन एकमेकांचे व्हाट्सअॅप नंबर शेअर करण्यात आले. त्यातून दोघांमध्ये बातचित सुरु झाली आणि काही दिवसांनी अक्षयने आपल्याला प्रपोज केलं, असं रुपाली यांनी सांगितलं आहे.

‘काही रुग्णांना रात्रीच्या वेळी घेऊन जायचा’

“काही लोकं जागेवर घाण करतात, ज्यांना गंभीर आजार आहे किंवा ते दुसऱ्यांना मारहाण करतात अशा लोकांना अक्षय हा रात्रीचा घेऊन जायचा. त्यानंतर तो त्यांना कुठेही सोडायचा. तो त्यांना कुठे सोडायचा हे माहिती नाही. माझ्यासोबत अन्याय झालाच. पण तो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन लोकांना फसवतोय. तो जे बोलतो त्याच्यावर विश्वास न ठेवता खरी सत्यता काय ते तपासावं. मी पोलिसात याबाबत तक्रार केलीय. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही”, असं देखील रुपाली म्हणाल्या.

हेही वाचा :

मुलाच्या सासरच्यांसोबत टोकाचा वाद, माजी सैनिकाने थेट गोळ्या झाडल्या, दोघांचा मृत्यू

बसमध्ये पहिली भेट, ओळखीचं प्रेमात रुपांतर, लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध, नंतर प्रियकर फरार

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.