बहिणीवर वाईट नजर असल्याचा संशयातून मुलाने सावत्र बापालाच संपवलं, कुठे घडला धक्कादायक प्रकार ?

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टिटावळा जवळील गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तेथे एक मुलाने त्याच्या सावत्र वडिलांचीच निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आह. वडिलांची आपल्या बहिणीवर वाईट नजर होती, असा संशय आल्यानेच मुलाने हे धक्कादायक पाऊल उचललं.

बहिणीवर वाईट नजर असल्याचा संशयातून मुलाने सावत्र बापालाच संपवलं, कुठे घडला धक्कादायक प्रकार ?
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 9:45 AM

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टिटावळा जवळील गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तेथे एक मुलाने त्याच्या सावत्र वडिलांचीच निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आह. वडिलांची आपल्या बहिणीवर वाईट नजर होती, असा संशय आल्यानेच मुलाने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करून टिटवाळा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला. आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या असून, पुढील कारवाई सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण टिटवाळा परिसरातील बल्याणी गावात ही हत्या घडली. हार्डवेअरच्या दुकानात काम करणारे कदीर सिद्दीकी यांची त्यांच्या सावत्र मुलानेच निर्घृणपणे हत्या केली. कदीर सिद्दीकी, हे आपल्या कुटुंबासोबत टिटवाळा परिसरात राहत होतो. त्यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्यापेक्षा वयाने मोठी असलेल्या महिलेशी लग्न केले होते. त्या महिलेला पहिल्या पतीपासून कबीर सिद्दीकी हा एक मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्यं होती.

मात्र रविवारी रात्री कदीर सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली, ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. या प्रकरणाचा तपास सुरू करून टिटवाळा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला. कदीर सिद्दीकी यांचा सावत्र मुलगा, कबीर सिद्दीकी, आणि त्याचा मित्र अल्ताफ शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या वडीलांची ( कदीर सिद्दीकी ) हे आपल्या बहिणीवर वाईट नजर आहे, असा संशय कबीर सिद्दीकी याला होता. त्या संशयातूनच त्याने आपल्या मित्राच्या मदतीने सावत्र वडिलांची धारधार शस्त्राने हत्या केली. टिटवाळा पोलिसांनी आरोपींची कबुली घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने बल्याणी गावात आणि टिटवाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.