गर्लफ्रेंडच्या नादात मुलगा बिघडला, जेव्हा पोटचाच गोळा बापाची हत्या करतो, अस्वस्थ करणारी घटना

उत्तर प्रदेशच्या औरैया येथे बाप-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे (son murder his father for opposing his love affair in UP).

गर्लफ्रेंडच्या नादात मुलगा बिघडला, जेव्हा पोटचाच गोळा बापाची हत्या करतो, अस्वस्थ करणारी घटना
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 2:52 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या औरैया येथे बाप-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका पित्याने मुलाला फक्त गर्लफ्रेंडशी फोनवर बोलण्यास मज्जाव केला म्हणून नराधम मुलाने आपल्याच वडिलांची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वडिलांच्या हत्येनंतर आरोपी मुलगा हा सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत (son murder his father for opposing his love affair in UP).

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही औरैया येथील भीखेपूर येथे घडली आहे. या गावात अरविंद कुमार आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांना 10 मुलं आणि 1 मुलगी होती. यापैकी मोठी मुलगी आणि मुलाचं लग्न झालं होतं. त्यांच्या पाचव्या नंबरचा मुलगा शिवम याचं एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. पण त्याला अरविंद यांचा विरोध होता. शिवम हा घरातही त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मोबाईलवर बातचित करायचा. याच मुद्द्यावरुन दोघं बाप-लेकामध्ये वाद व्हायचा. शिवमने प्रेमसंबंध करु नये किंवा संबंधित मुलीशी फोनवर बोलू नये, अशी त्याच्या वडिलांची म्हणजेच अरविंद यांची इच्छा होती. याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये सारखा वाद व्हायचा, अशी माहिती घरातील इतर सदस्यांनी दिली.

वडिलांच्या पोटात त्रिशूल खुपसला

अरविंद यांचा मुलगा प्रदीप याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अरविंद आणि शिवम यांच्यात सोमवारी (5 जुलै) प्रेमसंबंधांवरुन कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर शिवम घर सोडून निघून गेला होता. तो रात्री उशिरा घरी आला. पण त्याच्या मनात वडिलांप्रती प्रचंड टोकाचा द्वेश निर्माण झालेला होता. त्यामुळे तो घरी येताना एका मंदिरातून त्रिशूल सोबत घेऊन आला होता. तो घरी आला तेव्हा त्याचे वडील अरविंद हे झोपले होते. शिवम याने मागचापुढचा कोणताही विचार न करता थेट आपल्या पित्याच्या पोटात त्रिशूल खुपसला. त्यानंतर तो तिथून पळून गेला.

वडिलाचा मृत्यू

वडिलांचा जोरात किंचाळण्याचा आवाज ऐकून घरातील इतरांना जाग आली. त्यांनी तातडीने अरविंद यांच्याकडे धाव घेतली. यावेळी घरातल्यांनी जे बघितलं त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. अरविंद रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होते. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात नेलं गेलं. पण तोपर्यंत त्यांच्या शरीरातील बरंच रक्त वाहून गेलं होतं. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अरविंद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिवम याचा शोध सुरु केला आहे.

हेही वाचा :

पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप, संतप्त नागरिकांची दारव्हा पोलीस ठाण्यावर दगडफेक

VIDEO | ठाण्यात महिलेची छेड काढणाऱ्या गर्दुल्ल्याला भाजप महिला कार्यकर्त्यांचा चोप

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.