पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप, संतप्त नागरिकांची दारव्हा पोलीस ठाण्यावर दगडफेक

दारव्हा पोलिसांच्या मारहाणीत आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत तरुणाच्या नातेवाईकांनी दारव्हा पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. | Darwha police station

पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप, संतप्त नागरिकांची दारव्हा पोलीस ठाण्यावर दगडफेक
दारव्हा पोलीस ठाणे

यवतमाळ : दारव्हा पोलिसांच्या मारहाणीत आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत तरुणाच्या नातेवाईकांनी दारव्हा पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. तरुणाच्या मृत्यूची घटना रात्रीच्या सुमारास दारव्हा शहरात घडली. शेख इरफान शेख शब्बीर वय 27 वर्ष (रा. तरोडा), असं मृत युवकाचं नावं आहे. (Youth beaten to death by police Allegation relatives accused yavatmal Darwha police station)

उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू, पोलिसांची माहिती

या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा तालुक्यातील तरोडा रोड रेल्वे स्टेशन परिसर येथील दोन ते तीन तरुणांना पोलिसांनी दारव्हा शहरातून काही कारणास्तव ताब्यात घेतले होते. त्यातील एकाची प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शेख इरफान शेख शब्बीर असे मृत युवकाचे नाव आहे.

नातेवाईकांची पोलिस स्टेशनवर दगडफेक

घटनेची माहिती मृत युवक शेख इरफान शेख शब्बीर याच्या नातेवाईकांना मिळाली. त्यावरून संतप्त नातेवाईकांनी थेट दारव्हा पोलीस स्टेशन गाठून दगडफेक केली. या दगडफेकमध्ये काही वाहनाचे नुकसान झाले असून 2 ते 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक घटनास्थळी

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्यासह पोलिसांनी दारव्हा पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे. दारव्हा पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण होते.

(Youth beaten to death by police Allegation relatives accused yavatmal Darwha police station)

हे ही वाचा :

रेल्वेचा स्निफर डॉग रॉकीची कमाल, भंडाऱ्यात ट्रेन टॉयलेटवर लपवलेला 33 किलो गांजा पकडला

बांधाच्या वादातून पुण्यात वृद्धाची हत्या, दगडाने ठेचून नातेवाईकानेच प्राण घेतले

विक्रीसाठी गुटख्याचा साठा, 20 लाखांचा गुटखा जप्त, एकाला बेड्या, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI