बांधाच्या वादातून पुण्यात वृद्धाची हत्या, दगडाने ठेचून नातेवाईकानेच प्राण घेतले

शिरुर तालुक्यात केंदूर येथील ताथवडे वस्तीत जमिनी बांधाच्या वादातून 69 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. आरोपी भरत उर्फ बबलू सुदाम चौधरी याच्या विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बांधाच्या वादातून पुण्यात वृद्धाची हत्या, दगडाने ठेचून नातेवाईकानेच प्राण घेतले
पुण्यात वृद्धाची दगडाने ठेचून हत्या
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 12:20 PM

पिंपरी चिंचवड : जमीन बांधाच्या वादातून वृद्धाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील केंदूर येथील ताथवडे वस्तीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 69 वर्षीय वृद्धाची त्याच्या नातेवाईकांनीच हत्या केल्याचा आरोप आहे. (Pune Shirur Old man killed by relatives after fight over land territory)

नेमकं काय घडलं

शिरुर तालुक्यात केंदूर येथील ताथवडे वस्तीत जमिनी बांधाच्या वादातून 69 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. आरोपी भरत उर्फ बबलू सुदाम चौधरी याच्या विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेले शंकरराव ताथवडे आणि भरत हे एकमेकांचे नातेवाईक होते. जमिनीच्या बांधाच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

वृद्धाच्या पत्नीलाही मारहाण

हा सर्व प्रकार घडत असताना वृद्धाची पत्नी निर्मला शंकरराव ताथवडे या मध्ये आल्या. त्यावेळी आरोपी भरत याने त्यांनाही उजव्या हाताचा दंड आणि डोक्यावर मारहाण केली. शंकररावांची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला. कलम 302 प्रमाणे शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथमध्ये तरुणाची हत्या

दुसरीकडे, 21 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये घडली आहे. भाविक शिंदे असं मयत तरुणाचं नाव आहे.  अंबरनाथ पूर्वेच्या शिव मंदिर परिसरातील शाळेजवळ मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. भाविक शिंदे हा उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील ब्राम्हणपाडा भागात राहणारा होता.

भाविक आपल्या मित्रांसोबत तिथे आला असताना आरोपींसोबत त्याचा वाद झाला होता. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करुन त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तर पुढील तपास आणि आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

संबंधित बातम्या :

दिल्लीत माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीची हत्या, उशीने तोंड दाबून जीव घेतला

तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या भावाची लष्कर भरती करतो, 57 जणींना गंडवणारा ‘दादला’ पुण्यात अटकेत

(Pune Shirur Old man killed by relatives after fight over land territory)

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.