VIDEO | ठाण्यात महिलेची छेड काढणाऱ्या गर्दुल्ल्याला भाजप महिला कार्यकर्त्यांचा चोप

ठाण्यातील मनोरमा नगर परिसरात एका गर्दुल्ल्याने महिलेची छेड काढली होती. त्यानंतर पीडित महिलेने त्याच्या कानाखाली लगावली. त्यामुळे चिडलेल्या गर्दुल्ल्याने महिलेला थेट लाथा बुक्क्यांनी मारत मारहाण केली होती

VIDEO | ठाण्यात महिलेची छेड काढणाऱ्या गर्दुल्ल्याला भाजप महिला कार्यकर्त्यांचा चोप
ठाण्यात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची नशेखोराला मारहाण

ठाणे : ठाण्यात महिलेची छेड काढणाऱ्या गर्दुल्ल्याला भाजप महिला कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. महिलांचा छेड काढणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा या कार्यकर्तींनी दिला. ठाण्यातील ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. (Thane Manorama Nagar Druggist beaten up by BJP women volunteers for molesting lady)

नशेखोराची महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण

ठाण्यातील मनोरमा नगर परिसरात एका गर्दुल्ल्याने महिलेची छेड काढली होती. त्यानंतर पीडित महिलेने त्याच्या कानाखाली लगावली. त्यामुळे चिडलेल्या गर्दुल्ल्याने महिलेला थेट लाथा बुक्क्यांनी मारत मारहाण केली. त्यामुळे तिने भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडे धाव घेतली. अखेर संतप्त कार्यकर्त्यांनी गर्दुल्ल्याला मनोरमा नगर परिसरात भर रस्त्यातच चोप दिला.

गर्दुल्ल्यावर गुन्हा दाखल

महिलांनी चोप दिल्यानंतर गर्दुल्ल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. महिलांची छेड काढणाऱ्यांना सोडले जाणार नाही, त्यांनाही असाच चोप दिला जाईल, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी दिला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | रेशन कार्डवरुन वाद, नायब तहसीलदारांना महिलेची कार्यालयातच मारहाण

VIDEO | मोबाईलवर बोलणाऱ्या बाईकस्वाराचा ‘बेस्ट’ला धक्का, बस चालकालाच तरुणाची मारहाण

(Thane Manorama Nagar Druggist beaten up by BJP women volunteers for molesting lady)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI