AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonam Raghuvanshi : सोनमच्या 4 मैत्रिणी, सर्वात खास कोण ? राजाच्या आईला कोणावर संशय ?

Mystery Girl In Raja Raghuvanshi Case : राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपी सोनमची पोलिस कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. या हत्याकांडात फक्त सोनम आणि इतर आरोपीच नव्हे तर आणखीही कोणाचा तरी सहभाग आहे, असा दावा राजाची आई, भाऊ आणि ज्योतिषी यांनी केला आहे. सोनमच्या काही मैत्रिणींवरही राजाच्या आईला संशय आहे.

Sonam Raghuvanshi : सोनमच्या 4 मैत्रिणी, सर्वात खास कोण ? राजाच्या आईला कोणावर संशय ?
सोनमच्या त्या मैत्रिणीवर संशय वाढला..Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 20, 2025 | 9:39 AM
Share

इंदौरमधील व्यापारी राजा रघुवंशी याच्या क्रूर हत्येमुळे सगळा देश हादरलेला असतानाच त्यात रोज नवनवी माहिती समोर येत आहे. याप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेली राजाची पत्नी सोनम आणि इतरांची पोलिस कोठडी वाढवण्यात आली आहे. याचदरम्यान राजाच्या भावाने एक मोठी मागणी केली आहे. सोनमची नार्को टेस्ट करावी, अशी आमची इच्छा आहे. कारण हत्येमागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. अजून बरेच चेहरे उघड झालेले नाहीत, असे त्याने म्हटले. तर राजाच्या आईनेही सोनमच्या जिवलग मैत्रिणीवर संशय व्यक्त केला आहे.

राजाची आई उमा रघुवंशी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संशय व्यक्त केला. सोनमच्या चार मैत्रिणी आहेत. त्यापैकी एकीशी सोनमचं खूप जवळचं नातं आहे. मला त्या मुलीचे नाव आठवत नाही पण ती दिवसभर सोनमसोबत हत्याकांडात मिस्ट्री गर्लची एंट्री

त्याच्या आईचे हे विधान समोर आलेले असतानाच राजाच्या ज्योतिषाने असाही दावा केला आहे की सोनमचे समलैंगिक संबंध असू शकतात. या हत्येच्या रहस्यात आणखी एक महिला सामील असे ज्योतिषी अजय दुबे म्हणाले. ती दुसरी महिला कोण हे लवकरच उघड होईल, असं त्यांनी सांगितलं. ती दुसरी महिला सोनमची मैत्रीण देखील असू शकते असााही दावा त्यांनी केला. सोनमचे तिच्या मैत्रिणीसोबत लेस्बियन संबंध असू शकतात असा पुनरुच्चार त्यांनी केला. तिला मुलींमध्ये रस आहे, असं तिच्या पत्रिकेवरून दिसतं. या ज्योतिषांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल पूर्वी केलेले भाकित खरे ठरले आहे, असा दावा राजाच्या कुटुंबियांनी केला आहे.

राजाच्या भावाचं अपील काय ?

या हत्येत आणखी तिघं सामील असू शकतात असं राजाचा भाऊ सचिन याचं म्हणणं आहे. मात्र त्याने त्या तिघांची नाव्ं उघड केली नाहीत. लवकरच ते तीन चेहरे समोर येतील आणि राजा हत्येची कहाणी पूर्णपणे बदलेल, असा दावा त्याने केला. सोनमने ही गेल्या 8 दिवसांतही काहीच बोलली नाही, तर ती दोन दिवसांच्या पोलिस रिमांडमध्ये ती काय बोलेल?. तिची नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण आतापर्यंत तिने राजाला मारण्याचे कारण सांगितलेले नाही असे अपील राजाच्या भावाने केले.

राजाला आपणच मारलं हे सोनमने कबूल केलं असलं तरी त्याला मारण्यामागचं कारण काय होतं, हे तिने अद्यापही सांगितलेलं नाही. आम्हाला अजूनही हे समजू शकलेले नाही. या प्रकरणात पाच आरोपींव्यतिरिक्त अजूनही कोणाचा तरी सहभाग आहे असा आम्हाला संशय आहे. त्या व्यक्तीचं नाव समोर यावं आणि हे फक्त नार्को चाचणीद्वारेच शक्य आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.