क्राईम किस्से : पेशाने डॉक्टर, पण गैरकृत्यांची परिसीमा, 40 पेक्षाही जास्त टॅक्सी चालकांना मारुन मगरांना मृतदेह खाऊ घालणारा सीरिअल किलर

डॉक्टरांना आपण देव मानतो. पण काही डॉक्टर त्याला अपवाद असतात. ते निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचे असतात. आम्ही आज तुम्हाला अशाच एका डॉक्टराची माहिती देणार आहोत.

क्राईम किस्से : पेशाने डॉक्टर, पण गैरकृत्यांची परिसीमा, 40 पेक्षाही जास्त टॅक्सी चालकांना मारुन मगरांना मृतदेह खाऊ घालणारा सीरिअल किलर
पेशाने डॉक्टर, पण गैरकृत्यांची परिसीमा, 40 पेक्षाही जास्त टॅक्सी चालकांना मारुन मगरांना मृतदेह खाऊ घालणारा सीरिअल किलर
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 9:08 PM

मुंबई : डॉक्टरांना आपण देव मानतो. पण काही डॉक्टर त्याला अपवाद असतात. ते निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचे असतात. आम्ही आज तुम्हाला अशाच एका डॉक्टराची माहिती देणार आहोत. या डॉक्टरने गुन्हेगारीची तर परिसीमा गाठली होती. त्याने एक-दोन नाही तर जवळपास 100 जणांची हत्या केली आहे. सध्या हा डॉक्टर जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. या डॉक्टरने 40 पेक्षा जास्त टॅक्सीचालकांची हत्या करुन त्यांचा मृतदेह मगरींना खाऊ घातला आहे. आरोपी डॉक्टरने स्वत: याबाबत कबुली दिली आहे. या डॉक्टरचं देवेंद्र शर्मा असं नाव आहे.

आरोपी 16 वर्षांपासून जेलमध्ये

डॉक्टर देवेंद्र शर्मा हा मुळचा उत्तर प्रदेशच्या अलिगढ जिल्ह्यातील पुरेनी गावचा. तो गेल्या 16 वर्षांपासून जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मध्यंतरी त्याला पेरोलवर काही दिवसांची सुट्टी मिळाली होती. पण त्यानंतर तो परत आला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला दिल्लीतून बेड्या ठोकल्या होत्या. सध्या तो जेलची हवा खात आहे. या आरोपीचं वय सध्या 63 वर्षे इतकं आहे.

राजस्थानात क्लिनिक उघडलं, नंतर गॅस सिलिंडरची चोरी, अनेकांची हत्या

आरोपी देवेंद्र शर्मा याने 1984 मध्ये आयुर्वेदिक मेडिसीनमध्ये आपलं ग्रॅजवेशन पूर्ण केलं होतं. त्यानंतर त्याने राजस्थानात एक छोटसं क्लिनिक सुरु केलं होतं. त्याने 1994 मध्ये गॅस एजन्सीसीठा एका कंपनीत पैशांची गुंतवणूक केली होती. पण तिथे त्याचे फसवूक झाली. त्यानंतर त्याने 1995 मध्ये स्वत:ची खोटी गॅस कंरनी सुरु केली. त्याने एक गँग बनवली. त्या गँगद्वारे तो एलपीजी सिलेंडरची वाहतूक करणारे ट्रक आडवायचा. ट्रकचालकांची हत्या करायचा. त्यानंतर सिलेंडर चोरुन ट्रकची देखील व्हिलेवाट लावायचा. त्याने अशाप्रकारे गँगसोबत मिळून एकूण 24 खून केले.

किडनी ट्रान्सप्लाटच्या रॅकेटमध्ये सहभागी, टॅक्सी चालकांची हत्या

यानंतर देवेंद्र किडनी ट्रान्सप्लाटच्या रॅकेटमध्ये सहभागी झाला. त्याने 7 लाख प्रतिट्रान्सप्लान्टच्या हिशोबाने एकूण 125 ट्रान्सप्लान्ट केले. विशेष म्हणजे तो आता टॅक्सी चालकांना आपला शिकार बनवू लागला होता. तो दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये विविध राज्यांमध्ये पर्यटनाच्या नावाने जायचा. तिथे तो रात्री काही टॅक्सीने प्रवास करायचा. या दरम्यान सामसून रस्त्याचा फायदा घेऊन टॅक्सी चालकांची हत्या करायचा. त्यानंतर त्याचा मृतदेह मगरींना खान्यासाठी नदीत फेकून द्यायचा. तसेच तो टॅक्सी चोरुन पुढे विकून द्यायचा.

आरोपीला अखेर बेड्या

अखेर 2004 मध्ये देवेंद्रचा पापाचा घडा भरला. पोलिसांना त्याच्या गैरकृत्याची भनक लागली. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सर्व गुन्हे कबूल केले. कोर्टाने त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सलग 16 वर्ष कारावासाची शिक्षा भोगल्यानंतर त्याला जानेवारी 2020 मध्ये 20 दिवसांची पेरोलवर जामीन मिळाला होता. पण तो त्यावेळी पळून गेला.

आरोपीला पुन्हा बेड्या

देवेंद्र शर्मा जेलमधून पळून दिल्लीत आला. तिथे तो लग्न करुन राहू लागला. तिथे तो एका व्यापाऱ्याची फसवणूक करणार होता. पण पोलिसांना योग्यवेळी त्याची भनक लागल्याने व्यापाऱ्याचं होणारं नुकसान वाचलं. पोलिसांनी आरोपीला पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या. सध्या आरोपी जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.

हेही वाचा :

अंडरवर्ल्डकडून गुलशन कुमारांची निर्घृण हत्या, बॉलिवूडची भळभळती जखम, गुन्हेगार अनेक, शिक्षा एकालाच

छोटा राजनचा ‘चिंधी’ असा उल्लेख, भडकलेल्या माफिया डॉनकडून पत्रकार जे. डे यांची भर दिवसा हत्या, मुंबईत एकच खळबळ

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.