वडील रागावल्याने नाराज, दहावीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

15 वर्षीय तनिश झुनझुनवाला याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. (Surat Student Suicide father scolds)

वडील रागावल्याने नाराज, दहावीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सुरत : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सुरतमध्ये समोर आला आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे वडील ओरडल्याच्या रागातून विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Surat Student Suicide after father allegedly scolds him)

तनिश झुनझुनवालाचा राहत्या घरी गळफास

15 वर्षीय तनिश झुनझुनवाला याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. गुजरात राज्यातील सुरतमध्ये वेसू भागातील फ्लॉरेन्स अपार्टमेंटमधील राहत्या घरी काल दुपारी त्याने आयुष्याची अखेर केली. तनिशला त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

अभ्यासावरुन वडील रागावल्याने नाराज?

वडील विकास झुनझुनवाला तनिशला अभ्यास न केल्याबद्दल ओरडले होते. यामुळे नाराज होऊन तनिशने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र पोलिसांनी आत्महत्येचं नेमकं कारण काय, याला दुजोरा दिलेला नाही.

एकुलत्या एका मुलाचा मृत्यू

विकास झुनझुनवाला यांचा सुरतमध्ये कापडाचा व्यवसाय आहे. तनिश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.  तनिशला आधीपासूनच अभ्यासात गती होती. लॉकडाऊननंतर शाळा उघडल्यावर तो शाळेतही जायला लागला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी ते तनिशला अभ्यास न केल्याबद्दल ओरडले होते. त्यामुळे तनिश नाराज झाल्याचं बोललं जात होतं.

तनिशच्या आत्महत्येमुळे झुनझुनवाला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकुलत्या एका मुलाच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

कॉलेजमधील मुलांनी केलेल्या छेडछाडीला कंटाळून एका कॉलेज तरूणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील शेळवे गावात गेल्या महिन्यात घडली होती. संबंधित विद्यार्थिनी घराजवळ असलेल्या वाडीकुरोली भागातील कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती. ती सायकलवरून शाळेत दररोज ये जा करायची. गावातील तीन तरुण तिची छेडछाड करुन तिला सतत अपमानित करत होते. त्यांच्या या छेडछाडीला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.

संबंधित बातम्या

शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून वारंवार छेडछाड; वैतागलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अमेरिकेतून काही दिवसापूर्वीच कल्याणमध्ये, 11 वीतील विद्यार्थी 17 व्या मजल्यावरुन कोसळला

(Surat Student Suicide after father allegedly scolds him)