रंगपंचमीच्या दिवशी नातेवाईक, शेजाऱ्यांसोबत होळी खेळले; मग दुसऱ्या दिवशी दाम्पत्याचे थेट मृतदेहच आढळले !

घाटकोपरमध्ये एका दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दाम्पत्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकले नाही.

रंगपंचमीच्या दिवशी नातेवाईक, शेजाऱ्यांसोबत होळी खेळले; मग दुसऱ्या दिवशी दाम्पत्याचे थेट मृतदेहच आढळले !
घाटकोपरमध्ये दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 6:01 PM

मुंबई : सर्वत्र होळीचा उत्साह सुरू असतानाच घाटकोपर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. रंगपंचमीच्या दिवशी नातेवाईक आणि शेजाऱ्यांसोबत होळी खेळून एक दाम्पत्य घरी गेले. यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे मृतदेहच थेट आढळले. दाम्पत्याच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ माजली आहे. घरातील बाथरूममध्ये दोघांचे मृतदेह आढळले. घाटकोपर पूर्वेकडील पंतनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. दोघांच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमके कारण उघड होईल, असे घाटकोपर पोलिसांनी सांगितले.

नातेवाईकांनी घरी आले असता घटना उघड

दीपक शाह आणि टीना शाह अशी मयत जोडप्याची नावे आहेत. नातेवाईकांनी बुधवारी दुपारी मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही फोन उचलत नव्हते. त्यानंतर काळजीत सापडलेल्या नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली आणि शेजारच्या मदतीने बंद दरवाजाचे कुलूप उघडले. आत जाऊन पाहिले असता पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली.

शवविच्छेदन अहवालानंतर सत्य उघड होईल

दोघांचा मृत्यू नैसर्गिक की घातपात याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे. दोघांच्या शरीरावर कुठल्याही खुणा आढळलेल्या नाहीत. मात्र दोघांचा मृत्यू कशामुळे झाला हे रहस्य कायम राहिले आहे. याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवले आहे.

हे सुद्धा वाचा

अपत्य न झाल्यामुळे दाम्पत्य होते निराश

शाह दाम्पत्याला मूल नव्हते. यामुळे ते नैराश्येत होते. घरामध्ये पती-पत्नीशिवाय तिसरे कुणीच राहत नव्हते. धुळवड खेळून झाल्यानंतर पती-पत्नी घरामध्ये गेले. त्यानंतर आंघोळीला गेले असताना दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. मात्र त्यांनी कशा पद्धतीने जीवन संपवले हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच उघड होईल.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.