AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे बस अत्याचार : तो नराधम सराईत गुन्हेगार, याआधी त्याने…. धक्कादायक माहिती उघड

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकाजवळ शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराने राज्य हादरले आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याला पकडण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. पीडितेवर दोनदा अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येत आहे.

पुणे बस अत्याचार : तो नराधम सराईत गुन्हेगार, याआधी त्याने.... धक्कादायक माहिती उघड
पुण्यात स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरूणीवर अत्याचार
| Updated on: Feb 27, 2025 | 9:05 AM
Share

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. सोमवारी पहाटे 5.30 ते 6 च्या सुमारास एका 26 वर्षांच्या तरूणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला. आरोपीने एकदा नव्हे तब्बल दोनवेळा त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि तो फरार झाला. दत्ता गाडे असे आरोपीचे नाव असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे. तरूणीवर अत्याचार केल्यानंतर आकोपी फरार झाला असून त्याचा फोनही बंद आहे. शिरूर आणि पुणे पोलिसांची एकूण 13 पथकं ही या आरोपीचा शोध घेत आहेत. त्याच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

मात्र यासंदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवशाही बसमध्ये तरूणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्ता हा सराईत गुन्हेगार असल्याती माहिती समोर आली आहे. त्याच्यावर याआधीच जबरी चोरीचे गुन्हे हे शिरूर आणि शिक्रापूर पोलिस स्टेशन मध्ये दाखल आहे. आरोपी दत्ता गाडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे यामुळे उघड झाले आहे. त्याचा लवकरात लवकर शोध घेऊन अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक गुंतले आहे.

नेमकं काय झालं ?

पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती, त्यावेळी ही घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जात होती. ती स्वारगेट एसटी डेपो परिसरात असताना एका आरोपीने तिच्याशी गोडबोलत ओळख काढली. त्यानंतर फलटणला जाणारी बस दुसरीकडे थांबली असल्याचं सांगितलं. ती तरूणी एकटी असल्याचा गैरफायदा त्याने घेतला. त्यानंतर आरोपी तिला डेपो परिसरातच उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला. त्याने तिला आत जाण्यास सांगितलं. तरुणी बसमध्ये चढताच आरोपी लगेच तिच्या मागोमाग बसमध्ये घुसला. त्याने तिथे तरुणीवर बलात्कार केला व तिथून पसार झाला.

आरोपीने एकदा नव्हे तर तब्बल 2 वेळा तिच्यावर अत्याचार केला. पीडितेवर एकदा नाही तर दोनदा लौंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. हा अहवाल ससून रुग्णालयानं पोलिसांकडे पाठवला, त्यातून ही माहिती समोर आली.

स्वारगेट बसस्थानकात सुरक्षेचा मोठा प्रश्न; परिवहन मंत्र्यांचे कडक निर्देश

दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा आढावा घेत परिवहन मंत्र्यांनी कडक निर्देश दिले असून बसस्थानकांमध्ये उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत. परळ बसस्थानकात 20 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. बसचे दरवाजे-खिडक्या लॉक करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शेवटच्या बसनंतर प्रवेशद्वार बंद करण्यात आल. रात्री शेवटची बस आल्यानंतर स्थानकातील नशाखोर आणि गर्दुल्ले यांना बाहेर काढून प्रवेशद्वार बंद करण्यात आलं. १६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणीसाठी वाहतूक निरीक्षक नियुक्त, भंगार बसेस हटवून बस स्थानकात केवळ धावत्या बसेसच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतर काही बस स्थानकामध्ये व्यवस्थापनाने सुरक्षेचे उपाय त्वरित लागू केल्याचे दिसून येत आहे.

Follow Us
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन