तहसीलदाराच्या घरावर रेड पडली; गॅस पेटवून 20 लाखांच्या नोटा जाळल्या; पुढे काय घडले वाचा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहून दरवाजा बंद केला आणि तब्बल 20 लाख रुपये गॅसवर जाळण्याचा प्रयत्न केला (Tehsildar Burnt 20 Lakh Rupees).

तहसीलदाराच्या घरावर रेड पडली; गॅस पेटवून 20 लाखांच्या नोटा जाळल्या; पुढे काय घडले वाचा
Rajsthan ACB
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 11:44 AM

जयपूर : राजस्थानमध्ये दर दुसऱ्या दिवशी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पकडण्याचं सत्र (Tehsildar Burnt 20 Lakh Rupees) सुरुच आहे. तरीही भ्रष्टाचाराची प्रकरणं थांबायला तयार नाहीत. राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील पिंडो बारात तहसीलचे तहसीलदार यांनी तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहून दरवाजा बंद केला आणि तब्बल 20 लाख रुपये गॅसवर जाळण्याचा प्रयत्न केला (Tehsildar Burnt 20 Lakh Rupees On Stove After Seeing ACB Team Coming).

तहसीलदाराला अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दरवाजा तोडून अर्ध्या जळालेल्या नोटांसह तहसीलदार कल्पेश कुमार जैनला अटक केली. एसीबीला तक्रार मिळाली होती की तहसीलदार आपल्या राजस्व निरीक्षक पिण्डवाडाच्या माध्यमातून तिथे होणाऱ्या आवळा उत्पादनाच्या आवळा सालीच्या करारासाठी 1 लाख रुपयांची लाच मागत होते.

सूचना मिळाल्यावर पाली येथून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टीम पाठवली आणि तिथे 1 लाख रुपयांची लाच घेताना राजस्व निरीक्षक परबत सिंह यांना अटक केली. परबत सिंह यांनी सांगितलं की हा पैसा ते तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांच्यासाठी घेत आहेत. त्यानंतर परबत सिंह यांना घेऊन एसीबी तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांच्या घरी पोहोचली.

दार बंद करुन नोटा गॅसवर जाळल्या

एसीबी येताच तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांनी दार बंद केलं आणि नोटा आगीच्या हवाले केल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घरातून निघणारा धूर पाहिला आणि दार तोडून घराच्या आत घुसले. जवळपास 20 लाख रुपयांपेक्षा जास्तच्या नोटा जळाल्या होत्या, तरी यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घरुन 1 लाख 60 हजार रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत ().

इतर संपत्तीचा तपास सुरु

तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या इतर संपत्तीचा तपास सुरु आहे. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांची कसून चौकशी करत आहेत.

Tehsildar Burnt 20 Lakh Rupees On Stove After Seeing ACB Team Coming

संबंधित बातम्या :

सचिन वाझेंचे DNA सॅम्पल तपासणार, ‘त्या’ कारमध्ये सापडलेल्या साहित्याशी पडताळणी

सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवणाऱ्या विद्यार्थ्याच्या अटकेसाठी NCB घरी, आरोपीने अंगावर कुत्रे सोडले

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.