Washim : बोलरो पिकअप क्रुझरमध्ये भीषण अपघात, 6 जण गंभीर

देशात अनेकदा रात्रीचे अपघात होण्याचं प्रमाण अधिक त्यामुळे अनेक प्रवासी रात्री प्रवास करणं टाळतात. आत्तापर्यंत चालकाला अंदाज न आल्याने बरेच अपघात झाले आहेत. त्याचबरोबर पुढच्या गाडीच्या लाईटमुळे न दिसल्यामुळे देखील अपघात होतात.

Washim : बोलरो पिकअप क्रुझरमध्ये भीषण अपघात, 6 जण गंभीर
बोलरो पिकअप क्रुझरमध्ये भीषण अपघातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 9:20 AM

वाशिम – औरंगाबाद (Aurangabad) द्रुतगती महामार्गावर मंगरूळपीर तालुक्यातील पेडगाव (Pedgaon) फाट्यावर बोलेरो आणि क्रूझरचा अपघात झाल्याची घटना मध्यरात्री 2 वाजता घडली. यामध्ये 11 जण जखमी झाले असून, 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अकोला येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान पुण्यावरून नागपुरकडे (Nagpur) जाणाऱ्या बोलरो पिकअपने विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रुझरला जबर धडक दिली. यामध्ये क्रुझर व बोलरो पिकअप मधील असे 11 जण जखमी झाले. त्यामधील 6 जण गंभीर जखमी आहेत. यावेळी तत्काळ श्रीमती. साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने वेळीच घटनास्थळी पोहचून जखमीना मदत केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाला आहे.

सहा प्रवासी अत्यंत गंभीर

देशात अनेकदा रात्रीचे अपघात होण्याचं प्रमाण अधिक त्यामुळे अनेक प्रवासी रात्री प्रवास करणं टाळतात. आत्तापर्यंत चालकाला अंदाज न आल्याने बरेच अपघात झाले आहेत. त्याचबरोबर पुढच्या गाडीच्या लाईटमुळे न दिसल्यामुळे देखील अपघात होतात. काल झालेला अपघात हा अत्यंत भीषण होता. दोन्ही सुसाट गाड्या समोरसमोर धडकल्या आहेत. त्यामुळे गाडीत असलेले अकरा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा प्रवासी अत्यंत गंभीर असल्याचे समजले आहे. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना जवळच्या अकोल्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही वाहनांची पाहणी केली आहे. तसेच दोन्ही वाहनं रस्त्याच्या एका बाजूला घेतली आहेत.

यंदाच्या पहिल्या पाच महिन्यात 281 अपघात

अमरावती जिल्ह्यात पाच महिन्यात 163 अपघाती मृत्यू झाले आहेत. यंदाच्या पहिल्या पाच महिन्यात २८१ अपघात अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामध्ये 95 टक्के वाहनचालक पुरुषांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक 36 मृत्यू मार्च महिन्यात झाले आहेत. २०२१ च्या तुलनेत सध्या रस्ते अपघातामध्ये वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा

अनेकदा रस्ता खराब असल्याने मृत्यू होतो. तसेच चालकाचा गाडीवरीत ताबा सुटल्याने अपघात होतो.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.