AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dating app च्या माध्यमातून आधी आईला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि मग तिच्याच मुलीवर…

फोनवरील मैत्रीनंतर ही महिला या प्रोढ व्यक्तीसोबत अगदी पत्नीसारखी राहू लागली. आणि नंतर त्याने तिच्या मुलीलाही आपली मुलगी मानले परंतू त्याच्या मनात काही वेगळेच होते.

Dating app च्या माध्यमातून आधी आईला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि मग तिच्याच मुलीवर...
dating-appsImage Credit source: socialmedia
| Updated on: Apr 21, 2023 | 12:44 PM
Share

लखनऊ :  एका प्रोढ माणसाने डेटींग अ‍ॅपद्वारे एका महिलेशी ऑनलाईन गप्पा मारीत तिला आपल्या जाळ्यात ओढले. अनेक महिने या महिलेशी त्यांचे फोनवरून चॅटींग सुरू होते. परंतू या महिलेने आपल्याला एक मुलगी असल्याचे सांगत आपण एकत्र येऊ शकत नसल्याचे स्पष्ट करीत त्याच्याशी बोलायचे. त्यानंतरही त्या प्रोढ माणसाने तिच्याशी मैत्री चालूच ठेवून अखेर ते एकत्र येऊन राहू लागले. परंतू त्यानंतर त्याची नियत फिरली आणि त्याने या महिलेच्या अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेण्यास सुरूवात केली.

उत्तर प्रदेशातील बांदा बबेरू कोतवाली गावात राहणाऱ्या एका प्रोढ वयीन व्यक्तीने डेटींग अ‍ॅपच्या मदतीने राजस्थानातील एका महिलेशी मैत्री केली. या महिलेला आधीच्या पतीपासून एक अल्पवयीन मुलगी होती. फोनवरील मैत्रीनंतर ही महिला त्याच्यासोबत बांदा येथे एकत्र एक वर्षांपासून राहू लागली. त्यानंतर या प्रोढ व्यक्ती सोबत ही महिला पत्नी सारखी राहू लागली. आणि तिच्या मुलीला त्याने आपली मुलगी मानण्याचे नाटक केले. या महिलेने वारंवार मुंबईला जाण्याचा हट्ट त्याच्याकडे लावला. परंतू त्याने कशीतरी तिची मनधरणी करीत तिला शांत करीत राहीला.

नियत फिरली आणि…

काही काळानंतर या प्रोढ व्यक्तीची नियत फिरली आणि अखेरीस त्याने घरी कोणी नाही हे पाहून अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केला. 19 एप्रिल रोजी या कथित पतीने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तिने विरोध केल्याने त्याने तिला  मारहाण केली. ती जोरजोरात ओरडत असल्याने आणि कोणा तिने काही सांगू नये म्हणून तिला मारहाण करीत तिचा हातच मोडला. त्यानंतर तिची आई घरी आल्यावर तिने सर्व अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर या महिलेने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.

खूनाचा आरोपी बेलवर बाहेर

पोलिसांनी आरोपीवर बलात्कारासह पॉक्सो अ‍ॅक्ट ( POCSO ACT  ) दाखल करण्यात आला आहे. या आरोपीवर साल 2003 मध्ये झालेल्या खूनाचाही गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली असून तो कोर्टातून जामीन मिळाल्याने बाहेर पडल्याचेही उघडकीस आले आहे. आरोपीला अटक झाली असून त्याच्या विरोधात आता आणखी कठोर कारवाई होणार आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.