AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुंडांनी आधी कोयता घेऊन रील्स केला, नंतर पोलीसांच्या हाती लागल्यावर पोलीसांनीच नवा रील्स केला, पोलिसांची दबंगगीरी चर्चेत

दोघांनी कोयता घेऊन स्टेटस ठेवत हवा करण्याचा प्रयत्न केला पण पिंपरी चिंचवड पोलीसांनी असा काही धडा शिकवला ज्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे.

गुंडांनी आधी कोयता घेऊन रील्स केला, नंतर पोलीसांच्या हाती लागल्यावर पोलीसांनीच नवा रील्स केला, पोलिसांची दबंगगीरी चर्चेत
Crime NewsImage Credit source: Google
| Updated on: Jan 24, 2023 | 9:33 AM
Share

रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी-चिंचवड : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गॅंगने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. एकीकडे पोलीसांच्या कारवाईचा धडाका सुरू असतांना दुसरींकडे नवनवीन कोयता गॅंग व्हिडिओ शेअर करत, तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहे. हेच कोयता गॅंगचं लोण बाजूलाच असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात जाऊन पोहचलं आहे. मात्र, इथे पोलीसांनी केलेली कारवाई जोरदार चर्चेत आली आहे. कोयता घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलीसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. दोघांनी हातात कोयता घेऊन रील्स ठेवल्याचं पिंपरी चिंचवड पोलीसांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी दोघांना ताब्यात घेतले होते. दोघांची कसून चौकशी करत तपास सुरू केला होता. त्यामध्ये कारवाई दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीसांनी दोघांचा व्हिडिओ बनविला, यामध्ये आमची चुक झाली असे परत होणार नाही असा आशयाचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीसांच्या या कारवाईची जोरदार चर्चा होत असून सोशल मीडियावर दोन्ही व्हिडिओ शेअर केले जात आहे.

याच काळात पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या माध्यमातून उत्कृष्ठ काम करणाऱ्या पोलीस स्थानकांना गुण दिले जाणार आहे, चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाण्यांची नोंद ठेवली जाणार आहे.

त्यामुळे पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून कोयता गॅंगची दहशत मोडून काढण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करीत असतांना पिंपरी चिंचवड पोलीसांनी केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे.

गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या आवळण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस अॅक्शन मोडवर आले असून कोयता गॅंग दिसताच तिला जागेवर ठेचण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहे.

पुण्यात कोयता हातात घेऊन व्हिडिओ करणे, स्टेटसला ठेवणे असा एक ट्रेंडच सुरू झाला आहे, त्याचे लोण हळूहळू इतर शहरांत पसरत चालले आहे. त्यामुळे वेळीच कोयता गॅंगला रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद ठरत आहे.

कोयता घेऊन हवा करणाऱ्या दोघांचा आधीचा आणि नंतरचा असे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांकडून पोलीसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले जात आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.